युवकांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना सरकार पर्यंत पोचवणार. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचे आवाहन

आयडियाज् फॉर विकसित महाराष्ट्र' च्या निमित्ताने कोल्हापूर पूर्व दौऱ्यावर असताना अंबप येथील अशोकराव माने इंस्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालय येथे युवकांशी संवाद हा कार्यक्रम पार पडला. 
या अभियानाच्या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे म्हणाले की, आजच्या काळात युवकांनी आपले मत परखडपणे मांडले पाहिजेत युवकांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार चांगल्या योजना आणण्यासाठी आपले मत नोंद करून त्या प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी सरकार आणि युवक यांच्यातील दुवा म्हणून महाराष्ट्रभर मी प्रवास करत आहे आणि यातूनच विकसित महाराष्ट्र घडेल याचा मला विश्वास वाटतो.
फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रीय मीडिया प्रभारी श्री. अमनदीप सिंग, प्रदेश सरचिटणीस श्री. सुदर्शन पाटसकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. निवेदिता एकबोटे, श्री. अमृत मारणे, श्री. सचिन जायभाये, प्रदेश सचिव श्री. रौनक शेट्टी, तेजस्विनी कदम, गणेश साखरे, विद्यार्थी विभागाचे शिवानंद कानडे, जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद माने, तालुकाध्यक्ष श्री. विश्वास माने, संस्थाध्यक्ष श्री. विजयसिंह माने, जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रशांत बुगले, जिल्हा सरचिटणीस श्री. रविराज गाताडे, तालुका उपाध्यक्ष मा. अमर पाटील, तालुका सरचिटणीस कु. प्रथमेश शिंदे चिटणीस कु. ओंकार पाटील,कु. किशोर जासूद,मा. रोहित भंडारी, कु.प्रणव राठोड,मा अथर्व चव्हाण,मा विकास कांबळे,अभि खोत, स्वीकार कांबळे, रंजीत तोडकर, ऋत्विक पाटील, सुरज चौगुले,निलेश कांबळे, सौरभ बुढे, प्रसाद सनगर,दानिश कुंभार,केदार मोरे  यांच्या सोबत युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर पूर्व जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद माने यांनी केले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.