राष्ट्रभाषा परिषद परीक्षेत दि न्यू हायस्कूलचे नेत्रदीपक यश.
यड्राव (प्रतिनिधी ) - दि न्यू हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज इचकरंजी विद्यालयाने राष्ट्रभाषा परिषद परीक्षा-2024 मध्ये नेत्रदीपक यश मिळविले. या परीक्षेत विद्यालयाचा निकाल 100% लागला असून चार विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक तर शिक्षकांना आदर्श प्रधानाचार्य आणि आदर्श हिंदी अध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
राष्ट्रभाषा परिषद, पुणे यांचेकडून दरवर्षी या परीक्षेचे आयोजन केले जाते. यावर्षी विद्यालयातून 220 विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते. नुकताच परिषदेकडून या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. ज्यामध्ये दि न्यू हायस्कूल विद्यालयाचा निकाल 100% लागला असून कु.कोमल कांबळे इ.10 वी, कु. जोया जमादार इ.9वी, कु. श्रावणी माळकरी इ.8 वी, कु. अनन्या पाटील इ.5 वी अश्या चार विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमात नाईट कॉलेज, इचलकरंजीचे हिंदी विभागप्रमुख डॉ. माधव मुंडकर यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक, प्रमाणपत्र आणि हिंदी व्याकरण पुस्तक देवून सम्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रभाषा विकास परिषदेकडून विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. ए. कोळी यांना आदर्श प्रधानाचार्य पुरस्काराने तर मच्छिंद्र आंबेकर यांना आदर्श हिंदी अध्यापक पुरस्कार या विशेष पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. मुंडकर यांनी यशस्वी विद्यार्थी, शिक्षकांचे अभिनंदन करून हिंदी भाषेच्या विविध परीक्षा आणि रोजगाराच्या संधी यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक एस. एम. शिंदे यांनी केले तर एम.जी आंबेकर यांनी आभार मानले.
टिप्पण्या