अखेर बांधकाम कामगारांच्या पदरी निराशाच बोनसची नुसती घोषणा : कॉ. आनंदा गुरव.
इचललकरंजी - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांना दिवाळी दसऱ्या करिता पाच हजार रुपये सानूग्रह अनुदान देण्याची घोषणा कामगार मंत्री मा. सुरेश खाडे यांनी केली होती मात्र या घोषणा हवेतच विरघळली आहे याचा जाहीर निषेध व आश्चर्य व्यक्त महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने कॉ. आनंदा गुरव यांनी केले
. या कल्याणकारी मंडळाकडे विस हजार कोटी शील्लक आहेत, विविध शैक्षणिक, सामाजीक, आर्थिक लाभा पेक्षा गृहोपयोगी वस्तू (भांडी) अत्यावश्यक वस्तु संच ( पेटी ) यावर सर्वात ज्यादा खर्च केला जातो त्या मागील गोड बंगाल काय हा ही प्रश्न उभा राहतो मंत्री महोदयांनी घोषणाच्या अनुषंगाने कोणताही आदेश व परिपत्रक या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने अद्याप काढले नाही अधिकारी यांना विचारणा केली असता माहीत नसलेचे सांगण्यात येते. ही नोंदीत बांधकाम कामगारांची क्रुर चेष्टाच केलेले दिसते. मंडळाकडे वीस हजार कोटी शिल्लक असताना बांधकाम कामगारांना अडचनीच्या वेळेला पैसे देणे का टाळले अनेक संघटनांनी दिवाळी बोनस साठी गेली महिनाभर आंदोलने केली त्यावेळी का घोषणा केली नाही शेवटच्या टप्प्यात का घोषणा केली . असा सवाल कामगार नेते कॉ आनंदा गुरव यांनी केला.
टिप्पण्या