सेलूत जरांगे पाटील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : येथील सेलू तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन परभणी रोडवरील श्री राम कॉप्लेक्स मध्ये शुक्रवार दि. ४ ऑक्टो. रोजी करण्यात आले. 
उद्घाटन समारंभासाठी मराठा समाज प्रबोधनकार ह.भ.प. प्रसाद महाराज काष्टे, ह.भ.प.जयराम महाराज तांगडे, दादासाहेब गाडेकर, दत्तात्रय अप्पुसेठ सोळंके, जयसिंग शेळके, गोविंद काष्टे, सिद्धेश्वर खोसे, सिद्धेश्वर सोळंके,विष्णू सोळंके, पंजाब देशमुख,मनोहर पावडे, बाळकृष्ण पौळ, रामेश्वर गटकळ,गोविंद टकले,अनंत थोंबाळ, अनिल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
मराठा आरक्षणा संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या या सामाजिक लढ्यात शासनाकडून न्याय मिळेपर्यंत आरक्षणा च्या या चळवळीत संपुर्ण तालूक्यातील समाज बांधव सक्रिय सहभागी होतील असा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच संपर्क कार्यालयाच्या माध्यमा तून या लढ्यातील अडी-अडचणी सोडवण्यासाठी पुर्ण पणे सहकार्य केले जाणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.