भिमनगर-विद्यानगर परिसरात झालेल्या निघृण खूनाचा निपाणी पोलीसांनी केला उलगडा.
निपाणी -
दि. २ ऑक्टोबर रोजी भिमनगर-विद्यानगर परिसरात झालेल्या निघृण खूनाचा पोलीसांनी उलगडा केला असून सदर घटनेत मयत अशरफ अली शेअरली
नगारजी (वय २०,रा, दावलमलीक दर्गानजीक, निपाणी) याचा खून पूर्व वैमनस्य आणि २०२२ साली
मानवी गल्ली येथील अभिजीत दत्तवाडे या युवकाचा बदला म्हणून खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलीसांनी ७ जणांना
गजाआड केले असून यामध्ये सहभागी आणखीन ५ आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही जेरबंद करणार असल्याची माहिती सीपीआय बी.एस. तळवार यांनी दिली.याप्रकरणी पोलीसांनी रवि ईरण्णा शिरगांवे (वय, २७, रा.हणबर गल्ली), रोहित प्रशांत पठाडे (वय २४, रा. हौसाबाई सावंतकॉलनी), ओम दिलीप कंदले (वय२३, रा. कुंभार गल्ली), पारस संजय श्रीखंडे (वय २२, रा. जत्राट वेस) हृतिक सदाशिव पावले (वय २५,रा. महादेव गल्ली), अरबाज राजमहंमद सय्यद (वय २४, रा.
हौसाबाई सावंत कॉलनी), अनिकेत कृष्णा घोडगेरी (वय २२, रा. सासणे गल्ली, निपाणी ता. निपाणी) या ७ जणांना अटक करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.या प्रकरणातील मयत अशरफअली नगारजी याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. २०२२ साली अभिजीत दत्तवाडे खून प्रकरणातही त्याच्यावर खटला व
सुरू होता.
सदर घटनेनंतर उपरोक्त आरोपी व अशरफ
यांच्यात वारंवार वादाचे प्रसंग येत होते. याशिवाय हद्दीविषयीही व त्यांच्यामध्ये वाद सुरू होता.
त्याचेच पर्यवसान दि. २ ऑक्टोबर रोजी अशरफच्या निघृण खूनात झाले. दि. २ रोजी अशरफ व त्याचा भाऊ सैफअली नगारजी व प्रविण चौगुले हे तिघेजण नगारजी यांचे नातेवाईक अय्याज एकसंबे याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भीमनगर परिसरात आले असता तेथे लागूनच असलेल्या अंधारलेल्या म्युन्सिपल हायस्कूलच्या पिछाडीस दबा धरून बसलेल्या रवी शिरगावे, रोहित पठाडे, ओम कंदले आदींनी तलवार, कुऱ्हाड, गुप्ती अशा हत्यारांनी जोरदार हल्ला चढविला. यामध्ये अशरफअली नगारजी याच्या डोक्यावर व दोन्ही हातावर वर्मी घाव लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्याता खाली कोसळला तर सैफअली व प्रवीण हे दोघे जखमी . झाले. दरम्यान हल्लेखोरांनी खाली कोसळलेला अशरफअली हा मृत झाल्याचे समजून घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, या प्रकरणाची पोलीसांनी गांभिर्याने दखल घेत तपासाची चक्रे फिरवून ७ आरोपींना अटक करून त्यांची बेळगांव हिंडलगा कारागृहात रवानगी केली असून लवकरच आणखीन ५ जण पोलीसांच्या ताब्यात असणार आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख भिमाशंकर गुळेद, चिकोडी तालुका पोलीस उपअधिक्षक गोपाळकृष्ण गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय बी.एस. तळवार, फौजदार उमादेवी गौडा यांनी सहकाऱ्यांसमवेत केला.
टिप्पण्या