बोरगाव सिद्धेश्वर दूध संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना विक्रमी बोनस वाटप. चेअरमन आण्णासाहेब हवले

म्हैस दुधास 5 टक्के तर गायीस 
3 टक्के विक्रमी बोनस .
बोरगांव/प्रतिनीधी.

बोरगाव येथील श्री सिध्देश्वर दूध उत्पादक सहकारी संघाकडून संघाच्या सभासदना म्हैस दुधास शेकडा 5 तर गायीस 3 टक्के प्रमाणे उच्चांकी विक्रमी बोनस वितरण करण्यात येत असल्याचे दूध उत्पादक संघाचे संस्थापक चेअरमन आण्णासाहेब हवले यांनी सांगितले.

श्री सिध्देश्वर दूध डेअरीच्या 9 व्या बोनस वितरण समारंभाच्या अध्यक्षपदी बाबासाहेब पाटील हे होते.

शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांच्या उत्पादित दुधाला योग्य फॅट व रास्त भाव मिळवा,शिवाय गवळी व खासगी दूध विक्रेत्यांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांंची होणारी फसवणूक थांबावी,यासाठी आपण दूध डेअरीची स्थापना केली आहे.याचा शेतकऱ्यानं बरोबर महिला वर्गाला नक्कीच फायदा होईल असे ठाम मत प्रतिपादन संघाचे संस्थापक चेअरमन व चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सन्माननीय आण्णासाहेब हवले यांनी व्यक्त केले. तर दुध हा शेतकऱ्यांचा दुय्यम व्यवसाय असल्याने आपण दूध संघा बरोबर सभासंदच्या हिताला अधिक महत्व देत सर्वाधिक बोनस देण्याची परंपरा कायम ठेवली असून पंचक्रोशीत यंदा सर्वाधिक बोनस वितरण केले असल्याचेही सांगितले.

 तर मुक्या जनावरांचे संगोपन करून भागात जनावारांना संघा मार्फत मोफत रोग संसर्गन्य लस वाटप केले आहे.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही डेअरीला विक्रमी दूध पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांमध्ये म्हैस विभागात रावसाहेब सवाडे  प्रथम,दादासाहेब हवले यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर बाबासाहेब हवले यांनी तृतीय क्रमांक पटकविला आहे.तर गाय दूध विभागात अनिल कोटबागे प्रथम, माणिक चव्हाण द्वितीय तर शामराव मगदूम यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे.त्यामुळे अशा मेहनती व नामांकित शेतकरी दूध उत्पादक सभासदांना संस्थे मार्फत बोनस भेट-वस्तुंसह शाल-श्रीफळ देऊन सर्वांना गौरविण्यात आले.
चालू वर्षी दूध संघास दूध उत्पादकांकडून शहरात अपेक्षित दूध पुरवठा करण्यात आला आहे.संघा मार्फत दुध उत्पादकांना सर्वाधिक  इतका विक्रमी बोनस वितरित करण्यात आला आहे.दरम्यान दूध संघाकडून विकत दूध घेऊन जाणाऱ्या ग्राहकांनाही भेट वस्तू देण्यात आल्या आहेत.त्यामुळे ही संस्था दूध देण्याबरोबर दूध घेऊन जाणाऱ्यानाही तितकंच महत्त्व देणारी भागातील एकमेव आणि कौतुकस्पद दूध डेअरी आहे. की जी दूध पुरवठा करण्याबरोबर दूध घेऊन जाणाऱ्या ग्राहकांचाही विचार करते असे मनोगत संघाचे व्यवस्थापक राजगोंड पाटील यांनी मांडले.

याप्रसंगी विद्याधर अम्मनवर,बाबासाहेब पाटील,मलगोंडा म्हैसाळे,रावसाहेब सवार्डे,रामा कोत्तलगे,गोरख कुरळे,अक्कमहादेवी चिंचले,महावीर भिवरे,रत्नमाला मगदूम,आण्णाप्पा कडोले,भरत हवले,शिवापा माळगे,राजकुमार सोबने,आण्णासाहेब बारवाडे,आण्णासाहेब कोतलगे,बाळासाहेब बसन्नवर,व्यवस्थापक राजेंद्र पाटील,दर्शन फिरगन्नवर,अमित मालगावे,रावसाहेब तेरदाळे,संजय हवले,राजेंद्र पाटील,दर्शन फिरगन्नवर,अमित माणगावे,यांच्यासह डेअरीचे सर्वसदस्य,कर्मचारी उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण कोटबागे यांनी तर आभार संघाचे कार्यदर्शी राजू पाटील यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.