श्रीदत्ताबाळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे हॉकी स्पर्धेमध्ये घवघवीत यश

कोल्हापूर प्रतिनिधी - कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या महानगरपालिकास्तर १४ वर्षाखालील मुलांच्या शालेय हॉकी स्पर्धेत श्रीदत्ताबाळ हायस्कूल संघाने प्रथम क्रमांक मिळवला व विभागीय स्पर्धेसाठी संघाची निवड झाली.

विजेत्या हॉकी संघात कर्णधार शार्दुल जाधव, संकेत बंडागळे, रूद्र पाटील,साईप्रसाद खोत, तन्मय फलके, गणेश लोखंडे, श्लोक संकपाळ, स्वयंम भुयेकर, सर्वेश साळोखे, शौर्य कांबळे, शकुंत देसाई, अविष्कार दिंडे, कौस्तुभ मदनेि, आराध्य जाधव,आयुष राऊळ, अनिष मोरे, अर्णव लांबोरे, पार्थ पाटील यांचा समावेश होता. विजेत्या संघाला क्रीडा शिक्षक श्री. समीर भोसले व सौ. अनुराधा सडोलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
  तर संस्थेच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका सौ. पल्लवी देसाई, संस्थेचे सेक्रेटरी व माजी नगरसेवक श्री. निलेश देसाई, विश्वस्त श्री. वेद देसाई, संस्थेचे व्यवस्थापक श्री. संदिप डोंगरे, मुख्याध्यापक श्री. सचिन डवंग, मुख्याध्यापिका कु. रोहिणी शेवाळे यांचे प्रोत्साहन लाभले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.