कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून जयसिंगपूर येथील सराईत महिला गुन्हेगाराकडून २७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त

प्रतिनिधी:रियाज जैनापुरे
इचलकरंजी वडगाव बाजार समिती येथील महिलेच्या गळ्यातील धनहार चोरीला गेला होता याची माहिती कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती त्यानुसार तपास केले असता जयसिंगपूर येथील सराईत महिला गुन्हेगार ज्योती पाटील राहणार नांदणी जयसिंगपूर हिने हा हार चोरल्याची माहिती मिळाली असता कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेने माहिती काढून ही महिला कोल्हापूर येथील ताराराणी चौकात हा हार विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून त्या महिलेला अटक केली असता तिच्याकडून गुन्ह्याची कबुली देण्यात आली तसेच तिच्याकडील धनहार जप्त करण्यात आला ही कारवाई कोल्हापूर जिल्हा पोलीस अधिक्षक मा.महिंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या सह पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, धनश्री पाटील, शुभम सपकाळ, सुशांत पाटील,कृष्णात पिंगळे, अमित मर्दाने, महेश पाटील, आणि महेश खोत यांनी ही कारवाई केली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.