खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी.

शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने व प्रतिमा पुजनाने झाली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा सर व विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पुजन संपन्न झाले.यानंतर पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी आपल्या मनोगतातून महात्मा गांधी यांच्या कार्याची माहिती आपल्या मनोगतातून सांगितली. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा सर यांनी आपल्या मनोगतातून लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवना विषयी माहिती सांगितली.महात्मा गांधी जयंती निमित्त विद्यायालयातील नावेद जावेद मुजावर इयत्ता: 8वी या विद्यार्थ्यांने महात्मा गांधीची वेशभुषा सादर केली.व त्यांचा उपदेश सांगितला तसेच या निमित्त विद्यालयामध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थी- विद्यार्थीनी, शिक्षक-शिक्षिका,
शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.मगदुम.एस.बी.यांनी केले.तर सुत्रसंचालन श्री.शिकलगार एफ.आय.यांनी केले आणि आभार सौ.राजोबा एस.एस. यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.