पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून ३३ वर्षीय तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना हिस्सी येथे घडली.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   सेलू :सेलू तालुक्या तील हिस्सी येथील वैभव रामप्रसाद गात (३३) यांची हिस्सी शिवारात तीन एकर शेती आहे. यातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा, देऊळगाव गात बँकेकडून १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. दरम्यान नापीकी, दुष्काळ यामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला. हे कर्ज कसे फेडावे याच विवंचनेत वैभव गात हे होते. असे कुटुंबियांनी सांगतले. दरम्यान गुरूवारी रात्री राहत्या घरातील छताच्या फनला दोरीच्या सहाय्याने  गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार वैभव गात यांच्या आईच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना  माहिती दिली. याप्रकरणी घटनेची नोंद सेलू पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वैभव गात यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

हेस्कॉम कनिष्ठ अभियंता एस.आर.शिंदे, एक सौम्य स्वभावाचे आणि कार्यक्षम अधिकारी, निवृत्त

इमेज
रायबाग: हेस्कॉम कनिष्ठ अभियंता एस.आर.शिंदे, एक सौम्य स्वभावाचे आणि कार्यक्षम अधिकारी, निवृत्त झाल्यामुळे दु:ख झाले आहे, असे के. बलराम, बेंगळुरूचे सरचिटणीस के.व्ही.पी.एन.  निवृत्त होणारे हेस्कॉम कनिष्ठ अभियंता आणि चिक्कोडी सर्कल केव्हीपीआरएनआय नौकर संघाचे संघटक सचिव एस.आर.शिंदे यांच्या निरोप समारंभात ते गुरुवारी शहरातील हेस्कॉम कार्यालयाच्या सभागृहात उपस्थित होते.     शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या संघटनेत नोकरीबरोबरच कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे.  केव्हीपीआरच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या संघटनात्मक शक्तीचा खूप फायदा झाला आहे, असे त्यांनी सांगितले.  निवृत्त होत असलेल्या शिंदे यांना त्यांनी निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.  हेस्कॉम ईई आनंदा नाईक, बेसकॉमचे उपाध्यक्ष शिवराम, वरदराजू, पीजी अम्मीनाभावी, विजया गुंजीकारा, पी.एस.शिंदे, मारुती दोडामणी, आर.सी. काकलारा, दिलीपा दोडामणी, आर.एस.स्वामी, एम.डी. पाटील आदी उपस्थित होते.

डीपी प्लॅननुसार सेलू तील रस्त्याचे रुंदीकरण करा,अन्यथा आंदोलन करू: माजी आमदार लहाने यांचा इशारा.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  नूतन महाविद्यालय ते गोविंदबाबा चौक पर्यंत अतिक्रमण हटवण्यात सर्वांना समान हक्क द्यावा न दिल्यास आंदोलनाचा इशारा. सेलू : सेलू शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भविष्यातील 50 वर्षातील रहदारीसह विकासाच्या अनुसंगाने शासनाने शहराच्या चारीबाजूने डिपी प्लॅन तयार करून त्यानुसार रस्ते 24 मीटर रुंदीचे असून त्यात नाली,फुटपाथ, दुभाजक,विद्धूत पोल आदी बनविण्यासह रस्त्याच्या व शहराच्या सुशोभीकरणासाठी कोटयावधी रुपयांचा निधी मंजूर करून विकासकामाना तांत्रिक व प्रशासकीय  मंजुरी दिली आहे. मात्र पालिका प्रशासन मनाला वाटेल त्याचे बांधकाम पाडत आहे तर दुसरीकडे कोणाला सुट देत आहे.काही ठिकाणी अतिक्रमण न हटवता रस्ता कमी रुंदीचा करत आहे. शहरातील सर्व रस्ते डिपी प्लॅन नुसार करण्याची मागणी माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी गुरुवारी मुख्याधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली. यापूर्वी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते वालूर नाका मार्ग परभणी रोड फिल्टर पर्यंत डिपी प्लॅननुसार रस्त्याची मान्यता दिलेली होती.परंतु शासकीय मान्यतेनुसार तांत्रिक,प्रशासकीय मंजुरीनुसार सदर...

मलिकवाड सरकारी शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

इमेज
मलिकवाड - अमर माने मलिकवाड, ता. 31: येथील सरकारी मराठी, कन्नड प्राथमिक माध्यमिक व हायस्कूल शाळेत विविध कार्यक्रमानी  शुक्रवारी (ता.31) रोजी विद्यार्थ्यांचे प्रारंभोत्सव करण्यात आला. सर्वप्रथम शिक्षक,शिक्षिका यांच्या प्रमुख उपस्थित श्री सरस्वती प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढण्यात आले. त्यानंतर मराठी, कन्नड व हायस्कूल मुला, मुलींना शिक्षकांनी गुलाब पुष्प देऊन शाळेत प्रवेश देण्यात आला. यावेळी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकाची वितरण करण्यात आले. यावेळी यंदाच्या 2024-25 शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मंगळवारी (ता.28) रोजी गेले दोन दिवस शाळा स्वच्छ करणे, आवारातील कचरा गोळा करणे, झाडांना पाणी घालणे यासह, विविध शाळेतील कामे करण्यात आली होती.  यावेळी मराठी शाळेचे मुख्याध्यापक अजित माने, एस.एन.निवलगी, एम.बी. केरुरे, शिरीष माने, आय.एम. नदाफ, मीनाक्षी ढवळे, बी.एल.बेदरकर, एस. बी.चौगुले, एस.एस.पंडित, लोकरे मॅडम, मोपगार, माळगे यांच्यासह, विद्यार्थी, शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.

वीरनगर, नंदीकुरळी गावचा कन्नड वरिष्ठ प्राथमिक शाळा उद्घाटन सोहळा व पुस्तक वाटप कार्यक्रम संपन्न

इमेज
रायबाग    वीरनगर, नंदीकुरळी गावचा कन्नड वरिष्ठ प्राथमिक शाळा उद्घाटन सोहळा व पुस्तक वाटप कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.  बसवराजा भीमा कब्बुरे, सुधा बसवराज कब्बुरे आणि प्रमोदा राजू संगोटे यांनी शाळेत शिक्षण घेऊन देणगी दिली.  बसवराज भीमा कब्बुरे पाहुणे म्हणून बोलत होते, मी व अनेक विद्यार्थी अमेरिकेत अभियांत्रिकीचे काम करत आहोत.  आमच्या शाळेला मदत करण्याच्या उद्देशाने प्रोटेबल साउंड, कंपास, ड्रॉईंग किट्स, पुस्तके, बुद्धिबळ बोर्ड आणि प्रमोद राजू संगोटे यांनी शाळेला 7000 ची देणगी दिल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी मुख्याध्यापक ए.डी.पट्टारा, एस.डी.एम.सी.चे अध्यक्ष सिद्धू शिरोळे, ग्रामसदस्या सुनिला बिद्री, सहशिक्षिका चिन्नव्वा नायका, शांता खिलारे, सौजन्या पुजेरी, गावातील वडीलधारी मारुती दत्तवडे, मालती मठपती व शाळेतील अनेक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

शेकडो नदीचे घाट बांधकाम व सात-बारा उतारा निर्माण करणार्या राजमाता अहिल्यादेवी होळकर . ः कुणालसिंह नाईक निंबाळकर

इमेज
यड्राव  (प्रतिनिधी ) : 12 ज्योर्तिलिगांचा जिर्णोधार करणार्या महाराणी तसेच शेकडो नदीचे घाट बांधकाम व सात-बारा उतारा निर्माण करणार्या   राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय असे  प्रतिपादन व्यक्त केले. यड्राव (ता.शिरोळ) येथे ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कार्यक्रमात ते बोलत होते .   यावेळी सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले .  सरपंच निंबाळकर पुढे म्हणाले, पेशवाई काळात त्यांनी चांगल्या प्रकारे आपले राज्यकारभार सांभाळळा, त्यांचा आदर्श आजच्या पिढीने घेणे आवश्यक आहे. स्वत:च्या मुलगा मालेराव यांने केलेल्या कृत्याबद्दल त्यांना कडक शासन सुनावले होते. तसेच शेतीच्या विकासासाठी त्यांनी राज्यात अनेक योजना राबवल्या. माहेश्वर येथे त्यांनी हातमागावर साडया तयार करण्याचा मोठा उद्योग उभारला आजही माहेश्वर साडया प्रसिध्द आहेत. तसेच खासगी व सरकारी कोशासाठी व्यवस्था आखून दिली. आपल्या राज्यात कोणालाही दारिद्रय किंवा दु:ख भोगायला लागू नये यासाठी त्या नेहमी दक्ष असायच्...

सौ जयश्री पाटील राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

इमेज
विशालक्रांती वृत्तसेवा जयसिंगपूर  विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगरच्या अध्यापिका सौ जयश्री जगदीश पाटील यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले  नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फौडेंशन बेळगावी इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी यांच्यावतीने गोवा येथील हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन हरमल येथे सौ जयश्री पाटील राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित  जयसिंगपूर: प्रतिनिधी : येथील  विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगरच्या अध्यापिका सौ जयश्री जगदीश पाटील यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले  नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फौडेंशन बेळगावी इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी यांच्यावतीने गोवा येथील हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन हरमल येथे माजी खासदार अमरसिंह पाटील यांच्या हस्ते कर्नाटक सरकारचे जिल्हा कमांडंट होमगार्ड डिपार्टमेंट अरविंद घट्टी   कोल्हापूरचे माजी...

सौ.इंदुमती शंकराव गाट इंग्लिश स्कूल रांगोळी चा दहावीचा निकाल 100%टक्के

इमेज
रांगोळी प्रतिनिधी      रांगोळी येथील इंदुमती शंकरराव गाट हायस्कूलचे एस.एस.सी परीक्षा मार्च 2024 चा निकाल 100% लागला असून   यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी यशस्वी होण्याची परंपरा कायम राखली आहे.      या इंग्लिश हायस्कूलचा शंभर टक्के निकाल लागला असून प्रथम क्रमांक आम्रपाली दगडू कांबळे 86.80%, द्वितीय क्रमांक अभिजीत अरुण यादव 84.00% ,तृतीय क्रमांक तस्मिया बकश मुल्लाणी 82.80%,चतुर्थ क्रमांक वैष्णवी भगवान हावलदार 73.80% गुणांसह क्रमांक पटकावले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक ए आर कलाजे. पी एस पाटील,टी, एफ,  देसाई  येस, व्ही ,प्रज्ञासागर ,सी, बी, राजोबा , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले

अतिक्रमणामुळे युवकाचा आत्मदहनाचा इशारा.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  नूतन महाविद्यालय ते भांडवले यांच्या घरापर्यंत अतिक्रमण हटवण्यात सर्वांना समान हक्क न दिल्यास आत्मदहनाचा इशारा. सेलू : सेलूतील नूतन महाविद्यालय ते भांडवले यांच्या घरापर्यंत नवीन रोड बांधकाम सुरू असून ते नगर रचनेनुसार 24 मीटर रोड आहे. येथील अतिक्रमण हटवण्यात दिनांक 27 आणि 28 मे 2024 रोजी संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीतील होत आहे. मात्र अतिक्रमण हटवण्यात सगळे नियम मोडून मनाला येईल तेथे आपल्या आपल्या हित संबंध सांभाळून  वाटेल ते मनमानी करून एक लाईन रेषेत किंवा एक मोजमापाने न पाडता प्रशासक असून देखील राजकीय दबावापोटी स्पष्ट सर्व नागरिका समोर अन्याय करण्यात येत आहे ते अतिक्रमण हट्टविण्यात सुरुवात केली असता 18 मीटरने दोन घर पाडण्यात आली त्यानंतर लगेच दबाव आला आणि 16 मीटर करण्यात आले. चार घरे या मापाने पाडली की पुढे 20,22,24 मीटर पर्यंत वाढवत नेण्यात आले. त्यामुळे पुन्हा हे माप मनमानी 20 आणि नंतर 16 मीटर असे करण्यात आले जर 16 मीटर एका ठिकाणी केले तर 24 मीटर वाल्यांचे घर का पाडले..? आणि 24 मीटर वाले पाडले तर सगळ्यांचे 24 मीट...

जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी घेतला अनोखा उपक्रम.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  गुरुजी घेतात विद्यार्थी यांच्या गृहभेटी. मानवत : पी.एम श्री जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा मानवत येथील उपक्रमशील आदर्श शिक्षक रामराव सोळंके यांनी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी निकालपत्रासोबत वर्ग दुसरीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांना स्वतः तयार केलेला उन्हाळी अभ्यास दिला. तो अभ्यास विद्यार्थी पुर्ण करतायत का नाही ? हे पाहण्यासाठी हे शिक्षक 100 टक्के विद्यार्थ्यांना फोन करून संपर्क करतात. एवढेच नव्हे तर ते 100 टक्के विद्यार्थ्यांच्या गृहभेटी घेतात. पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. विद्यार्थ्यी सुट्टीत अभ्यासापासून दूर जावू नयेत. याची काळजी घेतात. सदरील शिक्षक हे मेंदू विकासावर सुद्धा काम करतात. या उपक्रम शील शिक्षकाचे शाळेचे मुख्याध्यापक बनसोडे सर आणि मानवतचे नुतन गट शिक्षणाधिकारी चव्हाण साहेब यांनी कौतुक केले.

यासेर उर्दू शाळेत आयशा उमीज चा पहिला क्रमांक.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.     सेलू : सेलू शहरातील  यासेर उर्दू  माध्यमिक शाळेचा निकाल 96.82 %  लागला असून दहावी  परीक्षेत  आयेशा उमीज हिने घवघवीत यश मिळवून  पहिला क्रमांक पटकावला. 27 मे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ  औरंगाबाद च्या वतीने  मार्च  2024 मध्ये घेण्यात आलेल्या इ. 10 वी बोर्ड परीक्षेत  सेलू येथील  यासेर उर्दू स्कुल मधील विध्यार्थीनी व सेलू येथील गुलमोहर कॉलोनी येथील रहिवाशी पठाण आयेशा उमीज मुबीन खान विद्यार्थिनीने 92.40 %गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. शालेतून प्राविण्य प्राप्त  पठाण अरीना फातेमा मुबीन खान 80.80 %  तर जोया खानम निसार अहेमद हिला 73.40% मार्क मिळाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल आयशा उमीज चे  वडील  मोबीन खान,आजोबा हाजी अब्दुल रौफ आमन खान, छोटे खान काका निसार अहेमद, अन्वर अली खान, शेख जहीर, अजहर पठाण,शेख मोहसीन,मिरझा जहीर बेग, याकूब खान, आकेब खान,शेख असीम, इरफान जमीनदार आदिनी उत्तीर्ण झालेल्या अभिनंदन केले आहे.

तब्बल पंचवीस वर्षानंतर श्री गणेश विद्यालय,कुंभार गल्ली येथील शाळेतील माजी विद्यार्थी आले एकत्र

इमेज
कोल्हापूर प्रतिनिधी:रियाज जैनापुरे रोजच्या धावपळीच्या जीवनात आपापल्या कामात व्यस्त असणारे पण कुठेतरी लहानपणीच्या आठवणी मनात  साठवून असणाऱ्या म्हणजे बालपण अशा बालपणीच्या शालेय आठवणी जाग्या करण्यासाठी कोल्हापुरातील जुन्या काळातील प्रसिद्ध अशी अनंत रघुनाथ लाटकर नाना गुरुजी यांची श्री गणेश शाळा कुंभार गल्ली पापाची तिकटी येथील 1993 ते 1999 पर्यंतच्या पहिली ते सातवीतील एकत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा व शिक्षकांचा सत्कार पार पडला. यामध्ये सगळ्यात वयोवृद्ध अशा शिक्षिका देशपांडे बाई 85 वय, चव्हाण सर,नामदेव गुरुजी, सतारमेकर बाई,संध्या बाई, कांबळे सर यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच माझी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी अरविंद कोळी, सुदर्शन कुंभार,तुषार पाडळकर स्वाती ससे, प्राजक्ता पाटील यांच्या सहयोगाने पार पडले.

उदगांव येथे तरूणांची आत्महत्या

इमेज
जयसिंगपूर : उदगांव (ता. शिरोळ) येथील राहूल ज्ञानदेव कुंभार (वय 39 रा.महावीर कॉलनी) याने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. कुंभार हा दिलीप चौगुले यांच्या घरी भाड्याने राहणेस होता. याबाबतची वर्दी रमेश कुंभार (रा.नरवाड ता.मिरज) यांनी दिली.

नृसिंहवाडी येथे नदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू

इमेज
जयसिंगपूर प्रतिनिधी शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे नदीकाठावर पारायण करत बसलेल्या युवकाचा पाय घसरल्याने नदीपत्रात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना  सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. तेजस दीपकराव कुलकर्णी (वय वर्षे २२ रा. गंगाखेड औरंगाबाद) असे त्या युवकाचे नाव असून याबाबत शिरोळ पोलिसात नोंद झाली आहे         याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड औरंगाबाद येथून चंद्रकांत जोशी , रोहिणी जोशी या आजी -आजोबांच्या बरोबर तेजस कुलकर्णी हा श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी आला होता.  सकाळपासून तो येथील  संगम काठावर पारायण करीत बसला होता. पारायण करीत असताना अचानक त्याचा पाय घसरल्याने तो नदीपत्रात बुडला व त्याचा यामध्ये मृत्यू झाला. यावेळी तेजस बुडल्याची माहिती कोणालाही नव्हती . त्याचे आजी - आजोबा परिसरात त्याचा शोध घेत होते. यावेळी वजीर रेस्क्यू फोर्सचे रऊफ पटेल व त्यांच्या टीमला ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी नदीपत्रात शोधा - शोध सुरू केली. यावेळी त्याचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला.       ...

न्यू मॉडर्न इंग्लिश स्कुल ची 100% निकालाची परंपरा कायम.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : आज दि .27 रोजी  एस . एस . सी बोर्ड2024 च्या जाहिर झालेल्या निकालात न्यू मॉडर्न  इंग्लिश स्कुल चा 100% निकाल लागला आहे.  कु .आरुषी अर्जुन बिडवे 94 .80 %( प्रथम), चि .राजेश काशिनाथ पल्लेवाड  92.80 (व्दितीय), कु .संस्कृती रुपेश भोवते 92.20%(तृतीय),चि .सर्वज्ञ अर्जुन निर्वळ 89%,कु .विधी बालाप्रसाद सोनी 88.60%,चि .वेदांत प्रवीण कुंभकर्ण 88.40%, चि.प्रथमेश रंगनाथ ढोले 86.20%, कु.विराज विष्णू शेवाळे 85.80%,कु.तनिष्का अमोल गाजरे 85.20%,कु.आर्या महेश खारकर 84.40%,कु.सृष्टी अशोक करवा  84%, चि.पुरुषोत्तम दिनकरराव साखरे 83.20%,चि.युवराज विजय वायाळ 83%, कु .सिद्धी पंकज झंवर 82.60%,चि.यश प्रफुल घेवारे 82.60%, चि.वरद अविनाश खरात 81.80%, कु.आरती अशोक केव्हारे 81.60%,कु. तन्वी सचिन धामणगावकर 81.60%,कु.राजनंदनी गजाननराव लिपणे 81.20%,चि.सोहम सचिन बोराडे, 80.80%, चि .आर्यन देविदास जाधव 80.40%,चि.उदय बाजीराव मगर 79.80%, चि.धनंजय विश्वनाथ बागल 78%,चि.पार्थ विनोद बोराडे 78%,चि.चैतन्य भगवान बोराडे 77.60%, कु.अलविरा आसिफ खान ...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत(SSC) नूतन कन्या प्रशालेचे घवघवीत यश.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   सेलू : सेलू येथील श्रीमती.लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेने SSC परिक्षा - 2024 मध्ये यशाची परंपरा कायम राखली असून प्रशालेचा एकूण निकाल 91.46% लागला असून प्राविण्य प्राप्त-107 विद्यार्थिनी प्रथम श्रेणी - 88 विद्यार्थिनी द्वितीय श्रेणी - 81 विद्यार्थिनी उत्तीर्ण श्रेणी  - 24 विद्यार्थिनी.1) कु.रोडगे ऋतुजा रामप्रसाद ( 97.40% ) या विद्यार्थीनीने प्रशाले मधून प्रथम क्रमांक मिळवला.2)कु.भुते समृध्दी कैलास ( 97.20% ) या विद्यार्थीनीने प्रशालेमधून द्वितीय क्रमांक मिळवला. 3)कु.कुलकर्णी गायत्री मधुकरराव(96.60%)या विद्यार्थीनीने प्रशाले मधून तृतीय क्रमांक मिळवला 4)कु.सोळंके श्रेया भगीरथ (96.60%)  या विद्यार्थीनीने प्रशाले मधून तृतीय क्रमांक मिळवला.सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम. लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे,चिटणीस.प्राचार्य.डाॅ.व्ही.के.कोठेकर, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.उज्वला लड्डा, उपमुख्याध्यापक डी. बी.घोगरे,...

दहावी बोर्ड परीक्षेत ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाची तनिष्का डख जिल्ह्यातून प्रथम.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  शाळेचा 100% निकालाची परंपरा कायम. सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानातीर्थ माध्यमिक विद्यालया तून  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेत कु. तनिष्का डख हिने ९९.८०% मार्क घेऊन  जिल्ह्यातून प्रथम येणाचा मान मिळविला.तसेच आघाव ऋतुजा 98.00%, रोडगे जान्हवी 97. 20%, बोराडे श्रुती 96.20%, तौर पल्लवी 95.40%, जाधव विशाखा 95.00% जाधव  श्वेता 94.86%, हारकळ वैजनाज 94.08%, ढवळे सावता 91.00%, संध्या शिलार 88.60%, सोळंके श्रावणी 88.60%,  खंदारे समृद्धी 88.40%, आघाव स्नेहल 88.40%, कव्हळे दर्शना 87.40%, चट्टे प्रदूम्न 87.60%, निर्मळ श्रुती 87.80%,  कव्हळे मानसी 86.80%, चव्हाण पृथ्वीराज 84.60%, डख प्रज्वल 84.40%, कदम वेदिका 84.40% ठोके धनश्री 84.00%, सागर सोनवणे 83.20%, दिव्या निकम 82.20%, गोटमुकले ऋतुराज 81.60%,  मावई आकाश 81.40% मांडे मानसी 81.48% डक वेदिका 81.00% सोळंके समृद्धी 80.60%, सावते श्रद्धा 80.00% कवडे ऋतुजा 80.00% यासोबतच एकुण 40 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह...

समाजप्रबोधन प्रेरणा पुरस्कार सौ शैलजा परमणे कोल्हापूर यांना प्रदान

इमेज
कवि सरकार इंगळी      कवि सरकार स्वामिनी वाचनालय यांचा कवियत्री व अध्यापिका सौ शैलजा मोहन परमणे कोल्हापूर यांना . राज्यस्तरीय समाज प्रबोधन प्रेरणा पुरस्कार  देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्कार वितरण सोहळा इंगळी येथील १७ व्या संमेलनात ॲड सर्जेराव साळवे छ संभाजीनगर . धुमाळकाका दिपक पवार अभिनेता गोपाळ वानखेडे अशोक मोहिते यांच्या हस्ते मोठया दिमाखात संपन्न झाला . शैलजा परमणे यांच्या काव्य क्षेत्रातील व शैक्षणिक  क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरावरील समाजप्रबोधन प्रेरणा हा पुरस्कार मान्यवरांचे हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले .त्यांना समाजभूषण पुरस्कार मिळालेने विविध स्तरातून कौतुक होत आहे . कवि सरकार स्वाभिमानी वाचनाल इंगळी सदस्य व ग्रामस्थ उपस्थितीत होते

बुद्धाचा विचारच आजची प्रतिक्रांती रोखू शकतो : ॲड. कृष्णा पाटीलभदंत एस. संबोधी थेरो, एस. पी. दीक्षित धम्मसंगिती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

इमेज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : आजची देशातील एकूण परिस्थिती पाहता आपण प्रतिक्रांतीच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिलो आहोत. देश धर्मराष्ट्र होण्याच्या दिशेने पावले टाकत असून, संविधान कधीही बदलले जाऊ शकते, अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रतिक्रांतीला फक्त बुद्धांचा विचारच रोखू शकतो, असे प्रतिपादन साहित्यिक व विचावंत ॲड. कृष्णा पाटील यांनी केले. ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सारा भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत, तथागत बुध्दांच्या धम्म विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आयोजित राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी दुसऱ्या सत्यशोधक विश्व धम्म परिषदेत बोलत होते. तत्पूर्वी वर्णव्यवस्थेची उतरंड समतेच्या सरळ रेषेत ठेवून अनोख्या आणि वैचारिक पद्धतीने दुसऱ्या सत्यशोधक विश्व धम्म परिषदेचे ॲड. कृष्णा पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बहुचर्चित निर्मिती फिल्म क्लब निर्मित आरक्षण : दुसरी बाजू...! या मराठी लघुचित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लेखक व व...

व्याख्यात्या स्वाती जंगम समाजप्रबोधन प्रेरणा पुरस्काराने सन्मानित...

इमेज
इंगळी... कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय,इंगळे व गोल्डन ग्रुप हनुमान चौक गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सतरावे मराठी साहित्य संमेलन शनिवार दि.25 मे 2024 रोजी उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले... या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवोदित लेखिका कवयित्री स्वाती जंगम यांना एडओकेट सर्जेराव साळवे यांचे हस्ते समाजप्रबोधन प्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात आले.. त्यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला... साहित्य क्षेत्राबद्दल त्यांच्या मनात असणारी प्रचंड आवड आणि आस्था याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी वर्णी लागली.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.गोविंद त्रिंबकराव लहाने (परभणी)होते... या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट अभिनेते धुमाळ काका, गोपाळ वानखेडे, मराठी चित्रपट अभिनेत्री मीनाक्षी पाखरे, प्रा.सुरेश कुराडे कवि दीपक पवार उपस्थित होते..      अशोक शर्मा गोंदिया, आनंत सांळुखे बार्शी, मंगेश शिवलाल बरई नाशिक, संजय महाजन अहमदनगर,नयन पाड अमरावती,  सौ.सुवर्णा अशोक मोहीते बार्शी, गवद बकराव लहा...

पवित्र हज यात्रेकरूंचा भव्यदिव्य असा सत्कार समारंभ संपन्न.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : पवित्र हज यात्रेसाठी जाणाऱ्या हज यात्रेकरू यांचा बोराडे यांच्या शास्त्री नगर येथील निवास स्थानी आयोजित खास संभारंभात बोराडे परिवाराच्या वतीने सहर्दय सत्कार समारंभ  करण्यात आला.ज्यात  सय्यद जफर सय्यद युसुफ,अब्दुल सत्तार अब्दुल रजाक,मोहम्मद रफीक अब्दुल रजाक, सतारभाई, शेख बिब्बन शेख हमीद, रियाजभाई,जलीलभाई, शिकुरभाई बागवान आदी हज यात्रेकरूना शाल, पुष्पहार,आणि मक्का मदिनाची छान अशी प्रतिमा व पवित्र कुराण ग्रंथ वाचन ठेवण्यासाठी पेटी आदी सह अत्यंत सहर्दयाने सन्मानित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे आयोजक सेलू खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष श्री मुकेशभाऊ बोराडे, माजी नगराध्यक्ष श्री विनोद बोराडे यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष श्री प्रभाकर सुरवसे, माजी नगरसेवक मिलिंद सावंत,कासिमभाई, वहीदभाई, इसाक पटेल, हाजी मेहमूद भाई,रमेश दौड, बालाजी सरकाले, व्यंकटबापू चव्हाण, नबाजीराव खेडेकर, राजेंद्र पवार,लक्ष्मण बुरेवार, जनाआबा सोळंके, सचिन कोरडे, अमर भैय्या सुरवसे, गौतम धापसे, मुख्याध्यापक श्री गोरे सर आदीजण उपस्थित होते. स्थळ:- बो...

रायबाग शहरात गुरुवारी विजेचा धक्का लागून एका महिलेचा मृत्यू

इमेज
रायबाग प्रतिनिधी - रायबाग शहरातील शोभा कृष्णा कुलगुडे (५२) या महिलेचा मृत्यू झाला  गुरुवारी सायंकाळी शहरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आणि नगरच्या रेल्वे स्टेशन रोडवरील उसाच्या शेतात (शेत) काम करणाऱ्या महिला पावसाचा आसरा घेण्यासाठी शेताच्या शेजारी उभ्या असताना शोभा कुलगुडे यांचा मृत्यू झाला.    इतर मल्लू मेत्री, भारती कामटे, प्रवीण धर्मट्टी, बाबुराव चव्हाण, प्रकाश मेत्री हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सैनिक टाकळीत नुकसानीचे तातडीने पंचनामेआमदार राजेंद्र पाटील यड्रावकर याच्या सूचनेनंतर गुुरुवारी सुट्टीदिवशीही यंत्रणा लागली कामाला 

इमेज
जयसिंगपूर/प्रतिनिधी-  सैनिक टाकळीमध्ये बुधवारी दुपारी सोसाट्याच्या वार्‍यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले. 50 हून घरांचे नुकसान झाले.  झाडे उन्मळुन पडली. विद्युत खांब कोसळले, विद्युत वाहिन्या तुटल्या परिणामी वीज पुुरवठा खंडीत झाला. यानंतर माजीमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तातडीने नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. गुरुवारी बुद्धपोर्णिमेच्या सुट्टी दिवशीही यंत्रणा कामाला लागली. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याबरोबरच नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. बुधवारी दुपारी सैनिक टाकळी परिसरास वादळी वार्‍याने तडाखा दिला. दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान दहा मिनिटाच्या  कालावधीतच वादळी वार्‍याने 50 पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले. वार्‍याचा वेग इतका प्रचंड होता की घरावरील पत्रे उडून अर्धा किलोमीटर  दूर जाऊन पडले. जनावरांचे गोठे, घरे, शेड यांचे नुकसान झाले. अनेक घरावरील प्लास्टिक पाण्याच्या टाक्या वार्‍यामुळे दूर उडून पडल्या.  भागातील आडसाली ऊस जमीनदोस्त झाला. खिद्रापुर टाकळी रस्त्यावर झाड कोसळले. मारुती मंदिर नजीक मोठे झाड उन्मळुन...

लोअर दुधनेतून 5346 क्यूसेक पाण्याचा विसर्ग.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  परभणी : दि.23 लोअर दुधना सिंचन प्रकल्पा तून दुधना नदीच्या पात्रात गुरुवारी (दि.23) दुपारपर्यंत 5346 क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यात सर्वत्र पाणी टंचाईसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांबरोबर संपर्क साधून लोअर दुधना प्रकल्पांतर्गत नदी काठावरील गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडण्याबाबत विनंती केली. त्याप्रमाणे जलसंपदा विभागाने तातडीने निर्णय घेवून बुधवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास 6 दरवाजे 0.50 मीटरने उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु केला. गुरुवारी दुपारपर्यंत दुधना नदीपात्रात 5346 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर या धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले.दरम्यान, या जलाशयात 102 दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा उपलब्ध आहे. यातून सेलू आणि मंठा या भागातील नागरीकांना जूलै अखेरपर्यंत पाणी पुरवठा होवू शकतो. दरम्यान, परतूर तालुक्यातील दहा ते 12 गावातील ग्रामस्थांनी या प्रकल्पातून पाणी न सोडण्या संदर्भात अभियंत्या...

उदगावमध्ये विवाहितेची आत्महत्या, पती, सासू-सासर्‍यावर गुन्हा

इमेज
जयसिंगपूर : प्रतिनिधी विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघाविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पती सुमित दिलीप सुतार, सासरा दिलीप गुंडू सुतार व सासू शैलेजा दिलीप सुतार (सर्व रा.देसाई विद्या मंदिर जवळ उदगांव ता.शिरोळ) अशी संशयित आरोपींची नावे असून कोमल सुमित सुतार (वय २८) हिने बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. दरम्यान पतीचे विवाहबाह्य प्रेमसंबंध व कौटुंबिक वादातून कोमलने आत्महत्या केल्याची तक्रार तिचा भाऊ रवींद्र कृष्णात सुतार (रा.घुणकी ता.हातकणंगले) यांनी पोलिसात आहे.

काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आमदार मा.पांडुरंग निवृत्ती पाटील(पी एन पाटील) अनंतात विलीन

इमेज
प्रतिनिधी:रियाज जैनापुरे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आमदार तसेच काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त म्हणजे 20 वर्षे जिल्हा अध्यक्ष पद भूषविलेले निष्ठावंत मा.पी एन पाटील हे काही दिवसापूर्वी त्यांच्या राजारामपुरी येथील घरामध्ये भुवळ येऊन पडले होते त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले त्या ठिकाणी त्यांना 5 ते 6 दिवस ठेवण्यात आले होते त्यांच्या मेंदूला इजा झाली होती मुंबई येथील न्युरो सर्जन यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती पण त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली बुधवार मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली करवीर चे आधारवड व ढाण्या वाघ अशी त्यांची ओळख होती आज त्यांची अंत्ययात्रा करवीर येथील सडोली खालसा गावातून काढण्यात आली सुमारे वीस पंचवीस हजार लोकांच्या मध्ये पी एन पाटील आनंतात विलीन झाले यावेळी गावातील वृद्ध महिला व पुरुष यांनी हंबरडा फोडला होता पीएन पाटील अमर रहे अशा घोषणा देत त्यांना शासकीय इसमात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले यावेळी सर्व पक्षातील मान्यवर उपस्थित होते तसेच करवीर तालुक्यातील सर्व गावे व गावातील व्यवहार बंद ठेवून पी एन पाटील यांना श्रद्धांजली...

नूतन च्या इनडोअर क्रीडा हॉल मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत.जिल्हाक्रीडाधिकारी कविता नावंदे.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने क्रीडा सुविधा योजना अंतर्गत उभारण्यात आलेले बंदीस्त प्रेक्षागृह  परभणी जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात भर घालणारे असुन या इनडोअर क्रीडा संकुलातुन आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावेत, संकुलाच्या उर्वरीत उभारणीसाठी लागणारा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यासाठी सदैव  प्रयत्नशील राहु असे प्रतिपादन जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांनी केले. येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू व परभणी जिल्हा तलवार बाजी असोसिएशन च्या वतीने गुरूवार दि.२३ मे रोजी आयोजित तलवार बाजी व कबड्डी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन  व तालुका क्रीडा संकुलाची पहाणी करताना उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन शिक्षण संस्थांचे अध्यक्ष डॉ सत्यनारायणजी लोया,प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, डॉ पांडुरंग रणमाळ, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे,तालुका क्रीडाधिकारी नानकसिंग बस्सी, मुख्याध्यापिका सौ.  उज...

केन बुद्धिबळ अकादमी इचलकरंजी आयोजित लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी, व्यंकटराव हायस्कूल इचलकरंजी सहकार्या ने बुद्धिबळ विकास उपक्रम राबविण्यात आला

इमेज
इचलकरंजी:                 रविवारी  केन चेस अकॅडमी इचलकरंजी यांच्या वतीने व्यकंटराव हायस्कूल व   लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या सहकार्याने  शहीद भगतसिंग उद्यान व व्यकंटराव हायस्कूल येथे बुद्धिबळाचा विकास आणि प्रसार होण्यासाठी SIMULTANEOUS CHESS EXHIBITION चे आयोजन करण्यात आले ; यामध्ये केन चेस अकॅडमी इचलकरंजी चे आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटू अथर्व तावरे आणि आराध्य ठाकूरदेसाई ,करण दबडे यांनी एकाच वेळी दहा -10 शालेय बुद्धिबळ खेळाडूंसोबत बुद्धिबळाचा डाव खेळला आणि तो जिंकला.  या उपक्रमामुळे कोल्हापूर, कुरुंदवाड, इचलकरंजी येथील  बुद्धिबळ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसोबत खेळण्याची संधी आणि अतिशय चांगला असा अनुभव मिळाला आहे.  या उपक्रमाचे उद्घाटन व्यकंटराव हायस्कूल शिक्षक श्री. राजेंद्र  आलोने  सर व शहीद भगतसिंग उद्यान कर्मचारी मंजुनाथ खंदारे यांच्या हस्ते झाले आणि या उपक्रमाचे आभार प्रदर्शन व्यकंटराव हायस्कूल क्रीडा शिक्षक श्री. गणेश बरगाले सर व गणेश गोरे यांनी ...

मिर्झा अझहर बेगचे बारावी परीक्षेत घवघवीत यश.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत  नूतन महाविद्यालयाचा विद्यार्थी मिर्झा अझहर बेग मिर्झा अबरार बेग याने बारावीच्या परीक्षेत 73,23 टक्के गुण घेत घवघवीत यश संपादन केले आहे. बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्या बद्दल मिर्झा अकबर बेग, हाजी शेख इमाम टेलर, मिर्झा अफसर बेग, मिर्झा असद बेग, पठाण रहेमान खान, मिर्झा ईसरार बेग, मिर्झा बाबर बेग, मिर्झा अरबाझ बेग, हाजी शेख अहेमद पाशा टेलर, पत्रकार शेख आरेफ भाई यांनी मिर्झा अझहर बेगचा सत्कार करून भविष्यातील शिक्षणासाठी शुभेच्छा दिले.

जयसिंगपूर चेस अकॅडमी वतीने चंद्रनारायण बलदवा इंग्लिश स्कूल जयसिंगपूर येथे बुद्धिबळ विकास उपक्रम राबविण्यात आला

इमेज
जयसिंगपूर: (रोहित पोळ)                रविवारी  चेस अकॅडमी जयसिंगपूर यांच्या वतीने आणि चंद्रनारायण बलदवा इंग्लिश स्कूल यांच्या सहकार्याने जयसिंगपूर येथे बुद्धिबळाचा विकास आणि प्रसार होण्यासाठी SIMULTANEOUS CHESS EXHIBITION चे आयोजन करण्यात आले; यामध्ये चेस अकॅडमी जयसिंगपूरचे आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटू संस्कृती सुतार आणि सिद्धी बुबणे यांनी एकाच वेळी दहा  शालेय बुद्धिबळ खेळाडूंसोबत बुद्धिबळाचा डाव खेळला आणि तो जिंकला.  या उपक्रमामुळे जयसिंगपूर व परिसरातील शालेय बुद्धिबळ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसोबत खेळण्याची संधी आणि अतिशय चांगला डाव खेळण्याचा असा अनुभव मिळाला आहे.  या उपक्रमाचे उद्घाटन चंद्रनारायण बलदवा इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक श्री. ए. आर. पाटील यांच्या हस्ते झाले आणि आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक श्री. राहुल डिग्रजे यांनी केली;  या स्पर्धेसाठी सूत्रसंचालन आणि मार्गदर्शन चेस अकॅडमी जयसिंगपूरचे  मुख्य प्रशिक्षक श्री. रोहित पोळ आणि श्रुती कुलकर्णी यांनी केल...

यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : सेलू शहरामध्ये यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाने एच.एस.सी परिक्षा -2024 मध्ये यशाची परंपरा कायम ठेवत विज्ञान शाखेतून चि. करवा अमेय सतिश या विद्यार्थ्यांने 88.83 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तर कु. श्रध्दा गोवर्धन उगले या विद्यार्थीनीने 79.17 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवला. तर कु. जयश्री माणिकराव पौळ (75.67 टक्के) गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. तसेच वाणिज्य शाखेत चि. घोडके युवराज शिवाजीराव (88.67 टक्के) गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तर कु. शितल नारायण आष्टकर (87.50 टक्के) या विद्यार्थीनीने दुसरा क्रमांक व कु. श्रध्दा कुंडलीक बागल (84.33 टक्के) गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला. आणि कला शाखामध्ये चि. सिमा गुलाबराव गजमल (83.50 टक्के) गुण मिळवून पहिला क्रमांक व कु. निकिता अशोकराव गजमल (77.30 टक्के) गुण घेऊन दुसरा क्रमांक मिळवला. चि. शेख समिर गुलाब या विद्यार्थ्यांने (77.17 टक्के) तिसरा क्रमांक. सर्व गुणवंत विद्यार्थ्यां चा सत्कार तसेच गुणगौरव संस्थेचे अध्यक्ष मुकेश हरिभाऊकाका बोराडे व संचालक  साईराज मुकेशभाऊ बो...

एसटी च्या नांदेड आगारात राष्ट्रीय दहशतावद विरोधी दिन साजरा कामगार - कर्मचाऱ्यांनी घेतली सामूहिकरित्या शपथ

इमेज
नांदेड - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. २१ मे २०२४ मंगळवार रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता आगाराच्यावतीने ३२ वा राष्ट्रीय दहशतावद व हिंसाचार विरोधी दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आगार व्यवस्थापक मा.श्री. अनिकेत बल्लाळ, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक विष्णू हारकळ, वाहतुक नियंत्रक राजकुमार कांबळे, कामगार नेते रघुनाथराव वाघमारे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, पाळी प्रमुख मनोहरराव माळगे, लिपीक सौ. सुनीता हुंबे, प्राजक्ता भालेराव, आशा वाघमारे, रेखा माचीनवार, शिल्पा ढवळे, कृष्णा पवार, संतोष देवकांबळे, गंगाधर वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन आपले विचार मांडले. ते आपल्या प्रास्ताविकपर भाषणात म्हणाले की, दहशतवाद व हिंसाचार हा भारत देशासहीत जगातील कोणत्याही देशाला न परवडणारी बाब असून भारत देशाचे सहावे व तरुण दिवंगत माजी पंतप्रधान, भारतरत्न राजीव गांधी यांची तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदूर येथे २१ मे ...

काय लाभ होतो नाम जप केल्याने---ह. भ. प. रमेश महाराज मोरे शास्त्री देवगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त

इमेज
अभिषेक खराडे  मंठा ता १९ (बातमीदार) : नामस्मरणाचे महत्त्व सांगणारे संतांचे अनेक अभंग आपण ऐकले आहेत. समाज माध्यमावर त्या संदर्भात एक छान लेख वाचण्यात आला. ती माहिती पाहता कदाचित आपला विश्वास बसणार नाही, मात्र नामस्मरण घेऊ लागल्यावर त्याची प्रत्यक्ष अनुभूती येते हे नक्की निश्चित्तच चमत्कार म्हणु अशा घटना आपल्या आयुष्यात नामस्मरणामुळे घडतात.  जर एखादी मोठी हानी होता होता आपण वाचतो अरे बापरे वाचलो हे कशामुळे वाचतो तर केलेले नामचिंतन ,आन्नदान ,सत्कर्म आड येते . नामजपाने आपघात ,नैसर्गिकहानी, महारोग,अर्थहानी ,अपयश ,हे ,संकटे ,विघ्न येत नाहीत प्रमाण देव ऊभा मागे पुढेनामाच्या चिंतने  बारा वाटा पळती विघ्नेसर्वकामात यश,येते व कार्यसिध्दी होते सर्वप्रथम आपण अबोल होतो. एकांताची आवड निर्माण होते. बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल. ते सुरुवातीला एकांतात होते. समाजापासुन अलिप्त रहात होते. साधना पुर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांत मिसळायला सुरुवात केली सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खुप गर्दी होते. इतके दिवस षड् रिपु आपल्या मनात ठाण मांडून बसलेले...

खास.धैर्यशील माने यांच्या विषेश प्रयत्नातून केलेल्या रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे रस्त्याची खडी उचकटू लागली सदर रस्ते कामाचे चौकशीची मागणी

इमेज
हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी गावात खासदार धैर्यशील माने यांचे फंडातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत रस्ते गटारीचे कामे सुरू आहेत. तर काही कामे पूर्ण झाली आहेत, रस्त्याचे काम नित्कृष्ठ झाल्यामुळे एक महिन्यापुर्वी पुर्ण केलेल्या काॅंक्रिट रस्त्याची खडी उचकटून रस्त्याला भेगा पडल्याने या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. सुरू असलेले रस्ते, गटारीचे काम नित्कृष्ट दर्जाची केले जात आहेत याबाबत नागरिकांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.        वार्ड नंबर 2 माने मळा परिसरातील पटेल कारखाना ते नारायण शिंदे यांच्या घरापर्यंत तीनशे फूट रस्ता एक महिन्यापूर्वी कॉंक्रिटीकरण करण्यात आला होता. सदर रस्त्याचे काम नित्कृष्ट झाले असून एका महिन्यातच काँक्रीट रस्त्याचे खडी उचकटून रस्त्यावर विखुरली आणि भेगा देखील पडल्यामुळे कामाच्या  दर्जा बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत संताप व्यक्त होत आहे.     काही कामे मार्च अखेर घाई गडबडीत पूर्ण करून सदर कामाची बिले देखील कॉन्ट्रॅक्टरने उचलली आहेत. मात्र पुर्ण करण्यात आलेल्या...

शिरटीकरांना मिळणार शुद्ध आणि मुबलक पाणी गावात कोट्यावधी रुपयाचे विकास कामे पूर्ण : राहुल सूर्यवंशी

इमेज
शिरोळ : प्रतिनिधी        शिरोळ तालुक्यातील शिरटी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली या योजनेच्या माध्यमातून आता ग्रामस्थांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळत आहे तसेच गावात कोट्यावधी रुपयाची विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत तर गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अनेक कामे प्रस्तावित आहेत अशी माहिती माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल सूर्यवंशी व विद्यमान सरपंच हसीना मुल्लानी यांनी पत्रकार बैठकीत दिली.           यावेळी पत्रकार बैठकीत बोलताना राहुल सूर्यवंशी म्हणाले की, गेले वीस वर्षे शिरटीकरांना प्राणी प्रश्न भेडसावत होता यासाठी सातत्याने पाठपुरावा करून पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली या योजनेचे काम पूर्णत्वास आले यामुळे गावात शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे त्यामुळे ग्रामस्थांच्यातून समाधान व्यक्त होत आहे तसेच गावच्या विकासासाठी प्रसंगी रास्ता रोको सारखे आंदोलन करून विकास कामे मार्गी लावले यामुळे शिरोळ घालवाड फाटा ते महावीर नगर ते शिरटी...

प्रमोद पुजारी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

इमेज
प्रतिनिधी अमर माने मलिकवाड चिकोडी तालुक्यातील ननदी येथील श्री हालसिद्ध नाथाचे पुजारी प्रमोद पुजारी यांचे गुरुवार दिनांक 16 मे 2024 रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी व भाऊ असा परिवार आहे रक्षा विसर्जन व पाणी ठेवणे शनिवार दिनांक 18 मे रोजी सकाळी नणदी येथे आहे

राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे कामामुळे बेशरमाचे झाडे लावून निषेध.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : सेलू शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 548 बी चे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. एक वर्षाच्या वर झाले तरीही पाच किलोमीटर अंतराची काम संपलेले नाही संबंधित गुत्तेदाराने या रस्त्याची माती विकून सेलूकारांची माती केली आहे. या रस्त्यावरील डिव्हायडर मध्ये शोभेच्या झाडे लावण्यासाठी काळ्या मातीच्या ऐवजी सर्रास दगडांचा उपयोग केला जात आहे. या रस्त्यावरील पथदिवे दोन महिन्याच्या वर झाले तरी सुरू झाले नाहीत. यामुळे अपघात होत आहेत. यात अनेक जण जखमी झाले आहेत व काहींनी आपला जिव गमावला आहे.संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या इंजिनीयरला वारंवार माहिती देऊनही यांनी यावर काहीच ॲक्शन घेतली नाही याचा निषेध म्हणून आज या रस्त्यावरील डिव्हायडरच्या दगडावर रांगोळी काढून यावर बेशरमाची झाडे लावण्यात आली. व निषेध करण्यात आला.अजूनही नीट कामे केली नाही तर याहून तिव्र आंदोलन सेलूवासियांतर्फे  करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला. यावेळी सेलू शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 548 बी चे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. एक वर्षाच्या वर झाले तरीही प...

सेलूत नरसिंह जन्मोत्सवाचे आयोजन.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.    भव्य पालखी ,धार्मिक कार्यक्रम. सेलू : सेलू येथील प्रतिवर्षा प्रमाणेच यावर्षी देखील यावर्षी देखील शहरातील पांडे गल्ली मधील नरसिंह मंदिर मध्ये नरसिंह जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे . या जन्मोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . दि १३ पासून या जन्मोत्सवास प्रारंभ झाला असून दररोज श्री च्या मूर्तीस अभिषेक व रात्रौ येथील गुरुवार पाठ मंडळाच्या वतीने गणपती अथर्वशीर्ष, रामरक्षा, भगवत गीता अध्याय,तसेच विष्णू सहस्त्र नामावलीचे पठण केले जात आहे . दि २१ मे या जन्मोत्सवाचा मुख्य दिवस असून त्यादिवशी सकाळी श्रीच्या मूर्तीस अभिषेक ,सायंकाळी सात वाजून तीन मिनिटांनी नरसिंह जन्म होणार आहे.यावेळी  वेद शास्त्र संपन्न तसेच भागवताचार्य नागनाथ महाराज विडोळीकर ( जोशी ) यांच्या सुश्राव्य व अमृततुल्य रसाळ वाणीमधून नरसिंह जन्म अध्यायाचे वाचन केले जाणार आहे .यानंतर महाआरती व तीर्थ प्रसाद वाटप केला जाणार आहे . तसेच रात्रौ साडेनऊ वाजता "श्री" ची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे .दि. २२ मे रोजी दु. १ ते ३ यावेळेत महाप्रसादाचे ...

देऊळगाव गात परिसरात वादळी वाऱ्यामुळे झाडे व सोलारचे नुकसान.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   सेलू :सेलू तालुक्या तील देऊळगाव गात येथील परिसरात दिनांक 13 व 14 मे रोजी सायंकाळी सहा वाजता  झालेल्या वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून  पडल्यामुळे  शेतकऱ्यांना सावली पासून मुकावे लागले तर या वादळी वाऱ्यामुळे  शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. देऊळगाव गात शिवारातील ज्ञानोबा लिंबाजी काळे यांच्या शेतातील गट नंबर 260 मधील वादळी वाऱ्यामुळे सोलार प्लेटचे नुकसान झाले असून 9 सोलार प्लेटा पूर्णतः मोडकळीस आल्या आहेत.  देऊळगाव गात येथील तलाठ्याने पंचनामा  केला असून ऐन उन्हाळ्यात मुक्या  जनावरांची व पशुधनाची  पाण्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्याची लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी सर्वत्र मागणी होत आहे.

सी बी एस सी परीक्षेत आकांक्षा बालासाहेब बोराडे हिचे दहावी परीक्षेत घवघवीत यश

इमेज
मंठ्याचे लोकप्रिय नगराध्यक्ष बालासाहेब जिजाभाऊ बोराडे यांची सुकन्या. अभिषेक खराडे  मंठा ता १६ (तालुका प्रतिनिधी) : विवेकानंद इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कुमारी आकांक्षा बालासाहेब बोराडे हिने सी बी एस सी दहावी परीक्षेत 92 टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे आकांक्षा बालपणापासूनच अत्यंत शांत संयमी व परिश्रमी असून ती सर्वांची लाडकी तथा लोकप्रिय नगराध्यक्ष बालासाहेब बोराडे यांची सुकन्या आहे सर्वसामान्यांच्या समस्या आस्थेने जाणून घेणारे जनसामान्यात लोकप्रिय असलेले व सर्वांना आपलेसे करून घेण्याचे कौशल्य आणि कुशल संघटक असे सर्वांचे लाडके शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आसाराम जिजाभाऊ बोराडे पाटील यांची पुतणी आहे या यशाबद्दल आकांक्षाचे काशिनाथ रामभाऊ घांडगे,स्वराज घांडगे, रमेश खराडे सर्व बोराडे फॅमिली व मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे तसेच तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे आकांक्षा ने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, काका- काकू, मामा-मामी, आत्या-मामा गुरुजन वर्ग शिक्षक मंडळी यांना दिले आहे 

इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कामगारांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे - विशाल घोडके

इमेज
गडहिंग्लज : (वार्ताहर) शनिवार दि. 11/ 04/ 2024 रोजी साधना हायस्कूल, गडहिंग्लज येथे आर्किटेक्टस ॲन्ड इजिनिअर्स वेल्फेअर असोसिएशन, गडहिंग्लज यांचेवतीने इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या गुणवंत कामगारांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.  यावेळी विविध कामगार कायद्यांची माहिती देत, इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कामगारांनी, शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन प्रमुख वक्ते कोल्हापूरचे सहा. कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी केले. प्रमुख पाहुणे सुरेश केसरकर यांनी राज्य व केंद्र शासनाच्यावतीने समाजातील सर्व घटकांना मिळणाऱ्या योजना व उपक्रम तसेच सोयी सवलती त्याचबरोबर राज्य व केंद्र शासनाचे विविध पुरस्कार याबाबत सविस्तर माहिती दिली. यापुढील काळातही समाजातील सर्वच घटकांसाठी शासनाच्या योजनांचा व उपक्रमांचा प्रचार तसेच प्रसिद्धी, तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. अध्यक्षीय मनोगतात साधना ज्यूनिअर कॉलेजचे प्राचार्य जे. बी. बारदेस्कर यांनी असो.च्या कार्याचे कौतुक केले व यापुढील काळातही असेच नाविण्यपूर्ण उप...

हज यात्रेसाठी निघालेल्या भाविकांचा सत्कार.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.   सेलू :- येथील साईबाबा नागरी बँकेच्यावतीने 2024 च्या हज यात्रेसाठी निघालेल्या भाविकांचा सत्कार  साईबाबा नागरी बँकेच्या मुख्य कार्यलयात आज दि. 14 में 24 रोजी दुपारी 4 वाजता सत्काराचे आयोजन  करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर हे होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष  चंद्रशेखर मुळावेकर, संचालक तथा माजी नगराध्यक्ष  पवन आडळकर,मुख्य कार्यकारी अधिकारी  रामराव लाडाने सय्यद मुश्ताक, सय्यद मकसूद, अब्दुल रफिक, अब्दुल वाजीद, अतिख कुरेशी उपस्थिती होती. सन 2024 ला हज यात्रेला जाणारे सत्तार भाई  बागवान, रफिकभाई बागवान, खुदारहीम पाटोदकर,शेख जलील सयद रियाजद्दीन,सयद जफर भाई , मोहमद अर्षद बागवान,सलीम भाई बागवान, जावेद भाई बागवान, पठाण सुलेमान खान, मोहमद शहिद,सयद रियाजद्दीन शेख बिबन भाई यांचा सत्कार मक्का मदीनाची फ्रेम, शाल,हार देऊन केला या वेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन व्यवस्थापक संतोष हुंगे यांनी केले. आभार व्यवस्थापक  पठाण निसार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  शेख अबूजर, गजानन झुटे,...

स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 39 वर्षानंतर ऋणानुबंधांच्या पडल्या गाठी. कोथळीच्या आदर्श विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात

इमेज
जयसिंगपूर : प्रतिनिधी : 39 वर्षांपूर्वी शिक्षण घेत असताना वर्गमित्रांच्या समवेतअसणाऱ्या ऋणानुबंधांच्या घटना डोळ्यासमोर येत असताना प्रत्येकाचं मन आनंदाने भरून येत असताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळताना दिसत होते या निमित्ताने प्रत्येकाच्या ऋणानुबंधाच्या गाठी दिसून येत होत्या निमित्त होते ते कोथळी येथील आदर्श विद्यालयातील सन 1984 - 85 सालातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याचे . आदर्श विद्यालयातील सन 1984 -85 या वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी रविवारी गुरुजन, मित्र मैत्रिणी, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी मुख्याध्यापक ए डी शिरोटे हे या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी होते, उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपले गुरुजन वर्गशिक्षक एस बी नेजकर ,एम बी चकोते, एन बी उपाध्ये, ए टी पाटील, टी एस माळी, डी बी भगाटे, एम बी चिंचवाडे, एन डी पाटील मॅडम ,ए बी पुदाले, ए एस बोरगांवे,जी एन पाटील व शिक्षकेतर कर्मचारी यांची पाद्यपूजा करून व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. जीवनात यशस्वी ह...

समाजात एकता आणि बंधुता प्रस्थापित करणे गरजेचे आहे . ः संत रामपालजी महाराज .

इमेज
यड्राव (प्रतिनिधी )                      मनुष्य जन्माचा उद्देश काय आहे. तसेच पारंपारिक रूढी-परंपरा,दंतकथा , पाखंडवाद,अंधश्रद्धा या बाबींना छेद देत,सर्व धर्मांच्या पवित्र शास्त्रानुसार सतभक्ती कशी करावी आणि त्याचे प्रमाण देखील सत्संग समागमात दाखवण्यात आले.  आपण कोणत्या ही धर्माचे,जाती, पंथाचे, किंवा गरीब व श्रीमंत असलो तरी एकाच परमेश्वराची लेकरे आहोत आणि सगळे सर्व धर्माचे सद्ग्रंथ  हेच प्रमाण देत आहेत . सर्व समाजात एकता आणि बंधुता प्रस्थापित करणे गरजेचे आहे . असे जगतगुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांनी कोल्हापूर येथील जाधववाडी येथे प्रवचनात सांगितले .                                              संत रामपालजी आपल्या प्रवचनात पुढे म्हणाले ,  आजर्यंत आपल्याला आपल्या सदग्रंथाचे पूर्णपणे ज्ञान नसल्यामुळे आपण आपल्या सद्ग्रंथाच्या विपरीत आचरण करत आहोत, आणि त्यामुळे आपण इतकी भक्ति करत असून ही दुःखी...

यड्राव येथील भीषण अपघातात 1 महिला ठार तर , 10 जण जखमी

इमेज
यड्राव (ता . शिरोळ )  येथे तवेरा चारचाकी गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले. ही घटना आज (दि.१३) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडली. लालबी कलबुर्गी (रा. संगमनगर, तारदाळ, ता. हातकणंगले) असे मृत महिलेचे नाव आहे. तारदाळ येथील संगमनगर मधील सनदी कुटुंबातील सर्व जखमी असल्याचे समजते. जखमींना सांगली सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यामुळे मार्गावर तासभर वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळावरु  मिळालेली अधिक माहीती अशी की ,   तारदाळ (ता . हातकणगंले ) संगमनगर  येथील सनदी कुटुंबीय नांदणी येथील नातेवाईकांकडे जात होते. नाईक निंबाळकर सेवा सोसायटी ओढ्याजवळ तवेरा कारवरील  (एम.एच.12 ई.एम.7422) चालकाचा दुसऱ्या वाहनाला चुकविताना ताबा सुटला. यामुळे गाडी तीन चार पलटी मारत रस्त्याकडेच्या ओघळीमध्ये पडली. यावेळी मोठा आवाज झाला. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. लालबी यांचा रक्तस्त्राव अधिक झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ...