साईराज भैया बोराडे मित्र मंडळ आयोजित SPL 2024 चा फायनल क्रिकेट सामना रोमहर्षक रित्या संपन्न.
शिवाजी शिंदे
सेलू : मा.नगराध्यक्ष विनोदरावजी बोराडे यांच्या वाढदिवसा निमित्त साईराज भैय्या बोराडे मित्र मंडळ आयोजित SPL 2024 चा अंतिम सामना दि.06/01/2024 रोजी नूतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर संपन्न झाला. चार दिवस चाललेल्या या लीग मध्ये एकूण आठ संघ खेळले त्या पैकी रसोई वॉरियर्स व गटकळ अकॅडेमी या संघाने फायनल पर्यंत मजल मारली.या वेळी अतिशय चुरशीचा सामना पहायला मिळाला. ह्या मधे रामेश्वर गटकळ ह्यांच्या गटकळ अकॅडेमी या संघाने रु. 41000 चे प्रथम पारितोषिक व ट्रॉफी जिंकून शशांक टाके यांचा रसोई वॉरियर्स संघ उपविजेता राहिला त्यांना रुपये 21000 व ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सेलू शहराचे मा. उपनगराध्यक्ष प्रभाकर तात्या सुरवसे,ह.भ.प. प्रसाद महाराज काष्टे, कपिल पडूळ ,अमरभैया सुरवसे यांची उपस्थिती होती. लीग चे नियोजन अमरभैया सुरवसे यांनी पार पाडले. सर्व खेळाडूंनी या वेळी साईराज भैया बोराडे यांचे क्रिकेट प्रेमींसाठी मोठी संधी उपलब्ध केल्या बद्दल अभाराची भावना व्यक्त केली.
टिप्पण्या