अपघातानंतर दहा लाख दंड व दहा वर्षे शिक्षा देणारा काळा कायदा रद्द करा. - क्रांती रिक्षा युनियन
इचलकरंजी वृत्तसेवा - अपघात झाल्यास चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड असा असलेला काळा कायदा सरकारने तात्काळ मागे घ्यावा या मागण्यांसह इतर मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकारी कार्यालयातील मा विनोद वस्त्रे यांना आज क्रांती रिक्षा युनियन वतीने देण्यात आले
देशभरामध्ये ऑटो टॅक्सी ट्रक बस टेम्पो सह सर्व प्रकारचे २५ करोड चालक-मालक ड्रायव्हर आहेत. या घटकांना कोणती सामाजिक सुरक्षा नाही त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी याकरिता आंदोलने सुरू आहेत. ह्या ड्रायव्हरला सुरक्षा देण्यापेक्षा ड्रायव्हर वर दंडात्मक कारवाईचा तोंड द्यावे लागते आणि आता तर अतिशय भयानक कायदा केला आहे. या कायद्याने आयुष्यचे उध्वस्थ होणार आहे. या व्यवसायात काहीही येणार नाही. अशा कायद्याने या व्यवसायाकडे कोणीही फिरवून बघणार नाही परिणामी देशभर मालवाहतुकीचा गोंधळ होऊन बसेल. अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल
हा कायदा रद्द करा या करिता ऑटो टॅक्सी, ट्रक. बस. टेम्पो चालक आणि मालक यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ऑटो, टॅक्सी, ट्रक, बस, टेम्पो चालक आणि मालक फेडरेशनच्या वतीने पुणे ते दिल्ली ड्रायव्हर जोडो यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली १ जानेवारी पासून या यात्रेला पिंपरी चिंचवड पुणे येथून सुरुवात झाली आहे. दिल्ली येथे ३ रोजी सकाळी १० वाजता आंदोलन होणार आहे. आंदोलनात देशभरातील चालक सहभागी होणार आहेत यात्रा महाराष्ट्र येथून गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब मार्गे दिल्ली येथे पोहोचली आहे या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी इचलकरंजीतील क्रांती रिक्षा युनियनच्या वतीने आपणास आज प्रांत यांना शिष्टमंडळ भेटून मागण्यांचे अपघात झाल्यास चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड असा असलेला काळा कायदा सरकारने तात्काळ मागे घ्यावा, देशातील सर्व चालकसाठी राष्ट्रीय कल्याण मंडळाची स्थापना करावी. त्याद्वारे सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, मुलांना शिक्षणाच्या सुविधा आणि वृद्धापकाळात पेन्शन सुविधा उपलब्ध करून द्यावी, राष्ट्रीय चालक आयोग स्थापन करावा. सरकारने देशभरात चालक दिन साजरा करावा आदि मागण्यांचे निवेदन देणेत आले.
यावेळी शिष्टमंडळात कॉ. आनंदा गुरव, मल्लिकार्जुन बिल्लुर, संजय ऐलाज, कयुम जमादार, दौलत भोरे, समीर नांदणीवाले, शाहीर जावळे, सुनिल गायकवाड, रामा कांबळे, तुषार रानभरे,शंकर रावळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या