दादर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचार मंच महाराष्ट्रच्या वतीने राज्यस्तरीय कविसंमेलन संपन्न .

कवि सरकार इंगळी

     डॉ .बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र आयोजित प्रथम वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय कवि संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला .  कार्यक्रमाचे उदघाटक आदरणीय भीमरावजी यशवंत आंबेडकर यांचे हस्ते व मान्यवरांचे उपस्थीत महापुरुषांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले 
प्रथम आदरणीय भिमराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा . कविसंमेलन अध्यक्ष बबन सरोदे मुंबई अनिल सावंत सर नरेंद्र पवार विनोद जाधव माला मेश्राम यांचा सन्मानचिन्ह क पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
त्याचप्रमाणे कल्पना टेंभुर्णीकर ' अर्चना चव्हाण 
नानाजी  रामटेक राजीव खंडारे मधुकर दिवेकर सुभाष मानवटकर   कवि संमेलन प्रमुख निमंत्रित सुनिल जाधव रनागिरी ' रिया पवार दहिसर ' जनार्दर मोहिते डॉ. एम के कांबळे रत्नागिरी ' तुषार नेवेकर नवी मुंबई ' गणेश मोरे खेड ' अश्विन निर्भवणे आदिचा सन्मान करण्यात आला . यावेळी  उदयनराजे वाघमारे यांच्या रमाई जीवन चरित्र व नम्रता खरे  यांच्या  काव्यसंग्रह पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले  यानंतर मान्यवरांनी आपल्या भाषणातून साहित्यिक कविना मार्गदर्शन केले . तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
सांयकाळी कवि संमेलनात कवि सरकार इंगळी . जेष्ठ कवि सिताराम नरके सर अॅड विजय कांबळे मुंबई चंद्रकांत जोगदंड आनंद गायकवाड ' गीताश्री अनुपमा पुंडलीक नाईक मुंबई . उदयनराजे वाघमारे संतोष खंडारे . रानकवी जगदिप वनाशिव सौ योगीता कोठेकर . नम्रता खरे . जयंत आकडे  वर्षा फटकाळे ' प्रांजली काळभेंडे ' आदी व अनेक कविनी सहभाग घेतला होता सुत्रसंचालन वैशाली खंडारे व कांचन लांजेकर यांनी केले . संमेलन डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन गोकुळदास पास्ता रोड दादर पूर्व मुंबई येथे रविवार १४ जानेवारी रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी 
आयोजक डॉ. विनोद जाधव प्रमुख सल्लागार ' नरेंद्र पवार अध्यक्ष ' माला मेश्राम उपाध्यक्षा ' अनिल सावंत सचिव यांनी परिश्रम घेतले होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.