बळीराजा संघर्ष समितीचा उद्या वालूर येथे दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन मेळावा.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

सेलू : बळीराजा संघर्ष समिती गेल्या कैक दिवसांपासून  सेलू तालुक्यात  शेती व शेतीपूरक व्यवसाय उद्योगाच्या अनुषंगाने गावोगावी जाऊन प्रबोधन करीत आहे. शेतकऱ्यांना शेतीवर आधारित जोड धंद्यांसाठी प्रेरीत करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ रोजी दुध उत्पादक व दुग्ध व्यवसाय नव्याने करून इच्छिणाऱ्या निवडक शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बळीराजा संघर्ष समितीचे अध्यक्ष 
अशोक काकडे असणार आहेत.
तर मेळाव्याला मार्गदर्शन परभणी येथील शासकीय पशुवैद्यकिय महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.नितीन र्माकंडेय, पाथरी तालुक्यातील बाभळगावचे शेतिनिष्ठ शेतकरी विठ्ठल आबा गिराम, परभणी तालुक्यातील दामपुरी येथील नंद डेअरी
व प्रशिक्षण केंद्राचे संचालक दिगंबर उत्तमराव बाबर आदी मान्यवर दुध व्यवसायावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत.उद्या दिनांक २२जानेवारी सोमवार रोजी सकाळी साडे दहा वाजता सेलू रोडवरील राधिका मंगल कार्यालय वालूर येथे संपन्न होणाऱ्या दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्याला  दुग्ध व्यवसाय करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन  बळीराजा संघर्ष समितीच्या वतीने रमेशराव डख, रमेशराव माने, रामेश्वर गाडेकर, विजयराव भुजबळ, अशोक उफाडे, गणेशराव काष्टे, बाबा आंधळे, संदीप घुगे, कल्याण जोगदंड, 
कॉ.रामेश्वर पौळ, कॉ.दत्तुसिंग ठाकूर,शिवाजी गजमल,लक्ष्मण झिंबरे, कल्याण पवार, राजकिशोर जैस्वाल,मथु कवटे, भगीरथ मोरे, गणेशराव मुंडे, रमेश धापसे, शिवाजी ढगे,उद्धवराव वाघ, जगन भाबट, बाळासाहेब बरसाले,योगेश काकडे, रवि कटारे, पुरूषोत्तम गजमल, आदींनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.