एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे ‘मुख्यमंत्री-माझी शाळा-सुंदर शाळा’ अंतर्गत आर्थिक साक्षरता अभियान
सेलू.श्रीराम प्रतिष्ठान सेलू संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे‘ मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’या अभियानांतर्गत आर्थिक साक्षरता या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आज आयोजन केले होते.
श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत आर्थिक साक्षरता या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रम (ता.8) वार सोमवार रोजी शाळेच्या ऑडिटोरिअम मध्ये पार पडला.या कार्यक्रम प्रसंगी मुख्य मार्गदर्शक सेलू एचडीएफसी बँकेचे मॅनेजर भारत पाटील, असिस्टंट मॅनेजर रविराज जाधव, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, ममता सिंग आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यामध्ये शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता या विषयाची माहित व्हावी व आर्थिक साक्षरता म्हणजे बजेट, इन्व्हेस्टिंग, क्रेडिट मॅनेजमेंट आणि फायनान्शियल मॅनेजमेंट इ. सारख्या फायनान्शियल संकल्पना समजून घेण्याची आणि अप्लाय करण्याची क्षमता. आर्थिक साक्षरता ही पैसे हाताळण्याची क्षमता आहे.बजेट, खर्च नियंत्रित करणे, कर्ज भरणे आणि इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्समध्ये रिस्क-रिवॉर्ड ट्रेड-ऑफ समजून घेणे आवश्यक आहे आर्थिक साक्षरतेसाठी. पैशांची वेळ मूल्य, कम्पाउंड इंटरेस्ट, वार्षिक रिटर्न आणि संधी खर्च यासारख्या मूलभूत आर्थिक संकल्पना समजून घेणे ही आर्थिक साक्षरतेचा भाग आहे, हे देखील समजून घेतले पाहिजे. आर्थिक साक्षरता म्हणजे तुमच्या जवळील पैशाचे केलेलं नियोजन. तसेच याप्रसंगी आर्थिक साक्षरता विषयाशी निगडीत विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे चर्चातून समजावत माहिती सेलू एचडीएफसी बँकेचे मॅनेजर भारत पाटील सरांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने शाळेत विद्यार्थ्यांना पैशाचे नियोजन कसे करावे , कश्याप्रकारे गुंतवणूक असते , बँकाचे व्यवहार, कर्जाची पद्धत कशी असते. त्यावरील व्याज प्रणाली इत्यादी बाबत माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच आर्थिक व्यवहाराकरिता UPI सारख्या आधुनिक साधनांचा वापर मोठ्याप्रमाणावर वापर होत असताना दिसत आहे ज्या पद्धतीने UPI, PHONE pay वापर सोपा आहे. तेवढाच तो वापर करतेवेळी काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. असे प्रतिपादन डॉ संजय रोडगे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना भाबट यांनी केले. आभार प्रदर्शन अर्जुन गरुड यांनी केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी मोठया संख्येनी उपस्थित होते.
टिप्पण्या