मलिकवाड येथे प्रजासत्ताक दिन साजरा, शालेय विद्यार्थ्याकडून सांस्कृतिक कार्यक्रम
मलिकवाड,प्रतिनिधी (अमर माने ) ता. 27 : येथील ग्रामपंचायतिच्या पटांगणात प्रजासत्ताक दिन साजरा झाला. महात्मा गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमा पूजन ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते झाले. प्रतिमेला विश्वनाथ पाटील, श्रीकांत सुतार यांनी हार घालून श्रीफळ वाढविले. ध्वजकट्टा पूजन राजू भिवशे, संदीप भोजने यांनी केले.त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्षा अनिता इंगळे यांनी ध्वजवंदन केले. सदस्य पुंडलिक खोत, संभाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचावर मराठी, कन्नड, प्राथमिक, माध्यमिक व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.यावेळी ग्रामस्थांकडून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. गावातील मराठी, कन्नड, हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. आर. माने यांनी ध्वजवंदन केले. सरस्वती महिला, मल्लिकार्जुन, लोकमित्र, रयत, किसान पीकेपीएस, जयहिंद असोसिएशन, कल्पवृक्ष, जनशक्ती, बीरेश्वर सोसायटी संस्थेत ध्वजवंदन झाले. यावेळी सर्व संस्थेचे संचालक, महिला, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, शिक्षिका, आजी-माजी सैनिक, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक एम.बी. केरुरे तर सदस्य संभाजी पाटील यांनी आभार मानले.
टिप्पण्या