बांधकाम कामगारांना 30 भांड्यांचा संसार सट मिळणार

इचलकरंजी - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत बांधकाम कामगारांना तीस भांड्यांचा संसार सट 26 जानेवारी पासून मिळणार आहे अशी माहिती मंडळाचे सचिव मा. विवेक कुंभार यांनी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन  (आयटक ) यांच्या संयुक्तिक बैठकीत सांगितले.
.      महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन (आयटक ) वतीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नोंदणी नूतनीकरण व विविध लाभ संदर्भात मंडळाकडे तक्रारी सुरू होते यासंदर्भात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांनी फेडरेशन व मंडळाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक मुख्य कार्यालय मुंबई येथे लावली होती या बैठकीमध्ये अनेक जिल्ह्यातील तक्रारी सचिव यांचे समोर मांडण्यात आल्या  यावेळी सचिव यांनी सर्व प्रश्नांची समाधान कारक उत्तरे देऊन चूकीचे  संबंधित अधिकारी यांच्यावर रीतसर कारवाई करू असे आश्वासन दिलेतर मंडळाच्या वतीने ३० भांड्यांचा सट  कामगारांना देणेच कार्यवाही अंतिम टप्यात असुन २६ जानेवारी पासुन मंडळाच्या वतीने देणार  असलेले त्यांनी  घोषीत केले. 
.    या  बैठकीला फेडरेशनचे राज्याध्यक्ष कॉ. संजय मंडवधरे, कॉ. आनंदा गुरव, कॉ विजय बराटे, धनाजी गुरव, कॉ. संतोष तेली, कॉ.अनिरुद्ध नखाते दिनकर लोहार , कॉ. बालाजी शितोळे, राजेंद्र कांबळे, बालाजी गंगाधर,भारत चव्हाण,धनराज कांबळे ,जयेंद्र भोगे,ज्ञानेश्वर मेश्राम, कॉ.विजय कांबळे, कॉ.संभाजी भेरे, यांच्यासह राज्यातील पदाधिकारी  बैठकीला उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.