जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांची चिकोडीला भेटलोकसभा निवडणुकीबाबत अधिकाऱ्यांना सूचना

चिकोडी प्रतिनिधी -
जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी चिकोडी लोकसभा निवडणूक सुरळीतपणे व कोणत्याही अडचणीविना पार पाडण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
चिकोडी तालुक्‍याला भेट देऊन आगामी लोकसभा निवडणुकीबाबत युवा मतदार, लोकसंख्या, लिंग गुणोत्तर माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले आणि आरडी कॉलेजच्या मस्टरिंग आणि डी-मस्टरिंग रूम आणि मतमोजणी केंद्रांची पाहणी केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी एस.एस.संपगावी, तहसीलदार सी.एस.कुलकर्णी, तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी एस.एस.कद्रोळी, सहाय्यक संचालक शिवानंद शिरगावी, महसूल निरीक्षक आल. आय. नाईक यांच्यासह उपविभागीय, तहसीलदार व तालुका पंचायत कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.