निपाणी टाकळी,ढेंगळी पिंपळगाव, करडगाव, आंबेगाव येथील मराठा बांधव आंदोलनासाठी मुंबईला रवाना.
सेलू : सरकारला सातत्याने वेळ देऊनही,अनेक गावामध्ये साखळी उपोषण,अमरण उपोषण करूनही सरकारने मराठा समाजाला अद्याप पर्यंत आरक्षण दिले नाही.महाराष्ट्रभर झालेल्या दौऱ्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी शेवटचा टप्पा म्हणून मुंबई येथे जाण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयासाठी सर्व मराठा समाज बांधव लखोंच्या संख्येने त्यांच्या सोबत मुंबईला जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी मराठा यौद्धा मनोज जरांगे पाटील अंतर वाली येथून मुंबईला शिवाजी पार्क येथे पदयात्रा काढून रवाना झाले आहेत तिथे ते आमरण उपोषणास सुरवात करणार आहेत.या पदयात्रेच्या सोबत लाखो मराठा समाज बांधवांनीही विवीध जिल्ह्यातून, तालुक्यातून,खेड्यापा द्यातून आप आपल्या वाहनातून जमेल तसे सहभागी होणार आहेत. या पद यात्रेची सुरुवात अंतरवाली सराठीतून झाली आहे. त्या उपोषणास सामील होण्यासाठी सेलू तालुक्यातील अनेक खेड्यातील मराठा समज बांधव मोठया संख्येने उपस्थित राहणार आहे.त्याच्याच एक भाग म्हणून निपाणी टाकळी सह ढेंगळी पिंपळगाव, करडगाव,गोगलगाव, आंबेगाव येथील मराठा समाज बांधव सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.सोबत स्वतःला लागणारे जीवनावश्यक वस्तू,स्वतःचा किराणा,गॅस,इतर सर्व अवश्यक साहित्य घेऊन जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाहीत या ठाम निर्णय घेऊन पूर्ण तयारीनिशी रवाना झाले आहेत. यावेळी आप आपल्या खेड्यातील महिलांनी सर्व मराठा समाज बांधवांना औक्षण करून गावातून मिरवणूक काढून त्यांना रवाना करून आरक्षण घेऊनच या अश्या शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या