नणदी फॅक्टरी उळागड्डी रस्त्यावर ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला मोटरसायकलची धडक एक ठार तर एक जखमी

विशालक्रांती वृत्तसेवा अंकली - ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला मोटारसायकलने धडक दिल्याने एक तरुण जागीच ठार तर एकजण जखमी झाला. हा अपघात नणदी कारखान्याजवळ एकसंबा रस्त्यावर झाला. ऋतिक विनोद मुनसे ( वय 24 ) रा. एकसंबा असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर सुभाष ढाले (वय 20) रा. एकसंबा असे जखमी युवकाचे नाव आहे.
याबाबत अंकली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अंकली पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या नणदी व उळागड्डीवाडी  रस्त्याच्या बाजूला उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला दुचाकी स्वराने मंगळवारी रात्री जोराची धडक दिल्याने  हा अपघात झाला. मुनसे हा जागीच ठार झाला तर ढाले त्याच्यावर बेळगाव येथे उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद अंकली पोलीसत झाली असून अधिक तपास अंकली पोलिस करत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.