साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत 31 जानेवारी रोजी मेळाव्याचे आयोजन
कोल्हापूर, दि. 24 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळागळापर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्ह्यातील मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील समाज बांधवासाठी दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता महालक्ष्मी मंगल कार्यालय, रुईकर कॉलनी, कोल्हापूर येथे महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले असून, मेळाव्यासाठी सर्व समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. एच. चव्हाण यांनी केले आहे.
टिप्पण्या