न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल सेलू येथे वार्षिक स्नेह संमेलनाचे संपन्न.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : दि. 12/1/2024 शुक्रवार रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचा पहिला दिवस पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मुकेश हरिभाऊ काका बोराडे तर शालेय समिति चे अध्यक्ष प्रभुदयालजी मंत्री सर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक  साईराज मुकेशराव बोराडे यांची प्रमुख उपस्थिति होती . कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती कुटे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक यांनी केले . तसेच स्वागत गीत शगीर फारूकी सर यांनी सादर केले . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ . रासकटाला  मॅडम यांनी केले .सदर कार्यक्रमात कवयित्री सौ संजीवनी तडेगावकर यांनी  चिमुकल्या साठी छान छान गोष्टी व कविता सादर केल्या . व तसेच विविध कला 'क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम आलेल्या 
 विद्यार्थी पारितोषिक व ट्रॉफी चे वितरण  करण्यात आले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतीक विभाग प्रमुख सौ लता नावाडे मॅडम व न्यू मॉर्डन इंग्लिश स्कुल मधील सर्व कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतलेले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.