प्रिन्स इंग्लिश स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 
सेलू : दिनांक २६ जानेवारी रोजी श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रिन्स इंग्लिश  स्कूल, प्रॉस्परस पब्लिक स्कूल, ज्ञानतीर्थ विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी महादेव साबळे आदित्य डी. एड. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. मीनाक्षी  रत्नपारखी, डॉ.राम रोडगे बी.एड  कॉलेजच्या प्राचार्या डॉ. निलीमा सिंग, अपूर्वा पॉलीटेक्निकचे प्राचार्य श्री.अशोक बोडके आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी प्राचार्य श्री अभय बन, एल के आर आर प्रिन्स  शाळेचे मुख्याध्यापक श्री. कार्तिक रत्नाला प्रॉस्पेरिअस पब्लिक स्कूल च्या  मुख्याध्यापिका सॊ. प्रगती क्षीरसागर, ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या मुखयाध्यापिका सौ. शालिनी शेळके व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.त्यावेळी चिमुकल्या मुलांनी  देशभक्तीवर गीत, नृत्य  सादर केले. काही मुलांनी कराटे सादर केले असे विविध कार्यक्रम शाळेत घेण्यात आले.भारत १५ ऑगस्ट १९४७ ला इंग्रजांच्या गुलाम गिरीतून मुक्त झाला आणि २६ जानेवारी १९५० रोजी आपली राज्यघटना अंमलात आली. म्हणजेच भारत देश प्रजासत्ताक झाला. यावर्षी देशभरात भारतीय संविधान लागू होऊन ७४ वर्षे पूर्ण होत आहेत. यावर्षी आपण ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. आपले महान भारतीय नेते आणि स्वातंत्र्यसैनिक महात्मा गांधी, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, लाला लजपत राय, सरदार वल्लभभाई पटेल आणि लाल बहादूर शास्त्री इत्यादींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. त्यांच्या स्मृतिस प्रजासत्ताक दिनी अभिवादन केलं जातं. या दिवशी राजधानी दिल्लीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीना ठाकूर केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.