एकटी संस्थेमार्फत पन्हाळा तालुक्यातील गोलीवडे गावात प्लास्टिक संकलन उप्रकम संपन्न.
एकटी संस्था तसेच छत्रपती शाहू कॅन्सर रिसर्च फौंडेशन वतीने कोल्हापूर शहर प्लास्टिक मुक्त व्हावे तसेच प्लास्टिकचे योग्य पद्धतीने निर्गतीकरण होण्यासाठी कचरा व्यवस्थापन व्हावे. याकरिता कोल्हापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी "प्लास्टिक मुक्त कोल्हापूर अभियान" राबविण्याचे काम सुरु आहे.
एकटी संस्थेमार्फत महानगरपालिकेच्या मदतीने शहरातील ओला व सुका कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे काम सुरु आहे. शहरातील भाजीपालामार्केट मधील ओला कचरा तसेच व्यापारी आस्थापनाचा सुका कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण तसेच पुनर्वापर केला जातो. दोन प्रभागातील ओल्या कचऱ्यापासुन खत निर्मितीचे काम संस्था करत आहे त्याचप्रमाणे शहरातील राजेंद्रनगर या ठिकाणी आरोग्य व पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने "स्वच्छसुंदर राजेंद्र नगर" हा पायलट प्रोजेक्ट राबविला जात आहे. या अनुभवातून व पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असा प्लास्टिक कचरा वर्गीकरण करणे व त्याचा पुनर्वापर करणे यासाठी संस्था काम करत आहे हे सर्व काम कचरावेचक महिलांना सोबत घेवून त्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी त्यांना रोजगार निर्मितीसाठी केले जात आहे. त्यातून कचरावेचक महिलांच्या मुलांना शिक्षण मिळवून देणे व कचरा वेचकांना आर्थिक सक्षम बनवणे हा संस्थेचा प्रयत्न आहे.
संपूर्ण शहर प्लास्टिक मुक्त व्हावे, यासाठी संस्था काम करत आहे. १ जानेवारी २०२४ रोजी नूतन वर्षानिमित्तमाझी वसुंधरा अभियान अंतर्गतपन्हाळा तालुक्यातील गोलीवडे गावामध्ये प्लास्टीकमुक्त शाळा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी एकटी संस्थेचे अध्यक्षा अनुराधा भोसले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखालीप्रकल्प समन्वयक शुभम कांबळे, प्रकल्प सुपरवायझर सविता कांबळे यांनी प्लास्टिकचे होणारेदुष्परिणाम व योग्य निर्गतीकरण याविषयी मार्गदर्शन केले. गोलीवडे गावचे सरपंच दिलीप पाटीलयांनी महिन्यातून एक दिवस गावातील प्लास्टिक संकलन करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी गोलीवडे गावचे सरपंच दिलीप पाटील, ग्रामसेवक विद्या जाधव व सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच एकटी संस्थेचे शून्य कचरा व्यवस्थापन प्रकल्प समन्वयक शुभम कांबळे, शून्य कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुपरवायझर सविता कांबळे, नयन जाधव, वैजयंता गुंडेवाडी उपस्थित
होते.
टिप्पण्या