सेलूतील भाविक प्रभू श्रीरामचंद्र यांच्या दर्शनास रवाना.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

 रेल्वेस्थानकावर माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या वतीने भाविकांचे स्वागत.

सेलू :  आज दि 23 मंगळवार रोजी शहरातील 44 भाविक प्रभू श्रीराम यांच्या दर्शनास सेलू हून आयोध्यास रवाना झाले यावेळी सेलू शहराचे लोकप्रिय 
माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्र मंडळाच्या वतीने सर्व भाविकांचे पुष्पहार , पुष्पगुच्छ श्रीराम नामाचा रूमाल देऊन स्वागत करण्यात आले.
या वेळी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, राजेंद्र पवार, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष सतीश जाधव, संघटक सुनील गायकवाड, भारत काठोटे, कुमार वानरे, पद्माकर वाकडीकर, अनिल केंधळीकर रवि मुळावेकर, नारायण ईक्कर, एन.एन.  देशपांडे आदी उपस्थित होते.रेल्वेस्थानकावर आयोध्यास जाणारे भाविक यांना शुभेच्छा देण्यासाठी शहरातील सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.