सेलू प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.


सेलू् : सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर साईराज भैय्या बोराडे मिञ मंडळ आयोजित तिसऱ्या सेलू प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धाचे उद्घाटन आज दिनांक 3 जानेवारी बुधवारी रोजी झाले. वेळी मुकेशराव बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, माजी उपनगरध्यक्ष प्रभाकर सुरवसे, साईराज बोराडे, मारोती चव्हाण, मिलिंद सावंत, राजेंद्र पवार, प्रसाद महाराज काष्टे, सहायक पोलिस निरीक्षक अशोक जटाळ, गौतम धापसे, शेख दिलावर, व्यंकटेश चव्हाण, रमेश दौड, सचिन कोरडे, विठ्ठल काळबांडे, राजेंद्र केवारे, लक्ष्मण बुरेवार सह आदींची उपस्थिती होती.पाच दिवसीय स्पर्धेत आठ क्रिकेट संघ भाग घेणार असुन यात वॉरियर्स टीम प्रायोजकत्व न्यु.मॉर्डन सी.सी,किंग्स एलेव्हन , जिजाऊ वॉरियर्स, नूतन क्रिकेट क्लब, गटकळ करिअर ॲकडमी, प्रिन्स वॉरिर्यस, रसोई वॉरियर्स, माऊली सुपरकिंग्ज  या आठ संघाची लढत आहे. 
गटकळ ॲकडमी वि. 
प्रिन्स वारियर्स संघामध्ये पहिला सामना झाला. या धावते समालोचन इरफान पठाण, यासेर शेख करीत आहेत.‌ गुणलेखक अभिजित चव्हाण. ७ जानेवारीला अंतिम सामना आहे. विजेत्यांना रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.