८७ होतकरू विद्यार्थ्यांचा साहित्य देऊन केला सन्मान.
शिवाजी शिंदे
वालूर येथील श्रीमती शांताबाई नखाते प्राथमिक आश्रम शाळेत माँ साहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत हात मदतीचा हाथ हा स्तुत्य उपक्रम
सेलू : दि. 12 शुक्रवार रोजी माँ साहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्त वालूर येथील श्रीमती शांताबाई नखाते प्राथमिक आश्रमशाळेत शुक्रवारी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांच्या सहकार्याने हाथ मदतीचा उपक्रमांतर्गत ८७ होतकरू विद्यार्थ्यांचा साहित्य देऊन सन्मान केला.
अध्यक्षस्थानी प्राचार्य रमेश नखाते होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड,
माजी पं.स. सदस्य इस्माईल सेठ अन्सारी, कृऊबासचे संचालक शैलेंद्र तोष्णीवाल, ग्रा.पं सदस्य विलास सोनवणे, धारोजी धाबे,पत्रकार राहुल खपले, शुकाचार्य शिंदे, मुख्याध्यापक शाम मचाले, अच्युत ठोके, वाटुरे यांची उपस्थीती होती.प्रारंभी माँ साहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर सामूहिक जिजाऊ वंदना चे गायन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी या महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे केली.मान्यवरांच्या हस्ते ८७ होतकरू विद्यार्थ्यांचा साहित्य देऊन सन्मान केला. प्रास्ताविक मुख्याध्या पक शाम मचाले यांनी केले.यावेळी सुनील गायकवाड म्हणाले की, थोर महापुरुषांच्या विचारांवर आपण जीवन जगले तर आपले जीवन समाजासाठी उपयोगी ठरेल. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून सहकार्याची भावना मनात बाळगून आपले कार्य करत गेले तर यश नक्कीच मिळते असे सांगितले.इस्माईल अन्सारी, शैलेंद्र तोष्णीवाल ,विलास सोनवणे ,शुकाचार्य शिंदे यांनी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन निलेश गडम यांनी केले तर पाराजी जाधव यांनी अभार मानले. यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक संजय वाशिंबे,योगेश गिराम, महेश राऊत, गणेश रेडेवाड, दत्तात्रय खोमणे, राजेंद्र पाटोळे, प्रसाद ढोकर ,रेवनआप्पा साळेगावकर, महेंद्र कदम, सुनील गोरे, मीना फंड, वंदना चौधरी, उद्धव झींजान , विठ्ठल होळकर यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या