मराठा कुणबी प्रमाणपत्र तातडीने द्या.नसता बेमुदत ठिय्या आंदोलन.
शिवाजी शिंदे
सेलू : सेलू जिंतूर तालुक्यातील मराठा कुणबी नोंदी शासनाचे आदेश असूनही मागच्या एक महिन्यापासून प्रलंबित होत्या त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेब परभणी व उपजिल्हाधिकारी सेलू यांना सकल मराठा समाज सेलू च्या वतीने मराठा कुणबी नोंदी तात्काळ देण्यात याव्या नसता कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्या अनुषंगाने आज सेलू येथील नवनियुक्त जिल्हाधिकारी लाहोटी साहेब यांची भेट घेतली व त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली व तात्काळ उपजिल्हा धिकारी लाहोटी साहेबांनी सेलु जिंतूर तालुक्यातील मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली. यावेळी जयसिंग शेळके, दत्ता आंधळे, शाम कर्हाळे, भागवत ताठे, मुंजाभाऊ लिपणे, आकाश काकडे आदी उपस्थित होते.
टिप्पण्या