मुख्याध्यापक भरत पाटील यांच्यकडून नववर्षानिमीत्तमिठाईचे वाटप

प्रतिनिधी - अलका रोडे मांजरी.
      येडूरवाडी येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक भरत पाटील यांनी नववर्षानिमीत्त विद्यार्थी व पालकांना शुभेच्छा देत मिठाईचे वाटप केले .
मुख्याध्यापक भरत पाटील यांनी गेली कित्येक वर्षे सरकारी शाळेमध्ये विवीध उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी शैक्षणीक साहीत्य वाटप, याबरोबर विदयार्थी व्यक्तीमत्व विकासासाठी विवीध उपक्रम राबवले आहेत. सरकारी शाळेतील विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशिल असतात. सामाजीक कार्यातही त्यांचा उत्साही सहभाग असतो. नववर्षानिमीत्त त्यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना  मिठाई वाटप करून शुभेच्छा दिल्या. सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची घटती स़ख्या पाहता पालकांनी मुलांना सरकारी शाळेत पाठवावे असे आवाहनही केले. यावेळी सिध्दापूरवाडी येथील कन्नड शाळेचे मुख्याध्यापक बी.डी कुंभार, एस बी  होळेनाईक, शंकर गायगोळ, राकेश माळकरी, सुधाकर कांबळे यांच्यासह कन्नड मराठी शाळेतील शिक्षक, अंगणवाडी  सेविका, पालक, ग्रामस्थ उपस्थित  होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.