राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.


सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदाची जयंती साजरी करण्यातआली.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक आदरणीय डॉ.संजय रोडगे सर ,शाळेच्या मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर मॅडम व शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते. राजमाता जिजाबाई यांची माहिती जिजाबाई या प्रचंड देशभक्त होत्या, त्यांच्या देशभक्तीचा शिडकावा फक्त रोम आणि रोममध्ये झाला. त्याशिवाय, त्यांना भारताची राजमाता म्हणून ओळखले जात असे. त्यांनी त्यांचे पराक्रमी पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात असे आदर्श रुजवल्यामुळे, त्यांच्यात देशभक्ती आणि नैतिक चारित्र्याची बीजे पेरल्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराज एक वीर, महान राजे, देशभक्त आणि कार्यक्षम प्रशासक बनले. तसेच
स्वामी विवेकानंदांच्या मते धर्म हा शिक्षणाचा गाभा होय. धर्माची संकुचित व्याख्या नव्हे, तर एका व्यापक धर्माची व्याख्या प्रस्तुत केली आहे. धर्म म्हणजे अनंत बल, बल म्हणजेच पुण्य, दुर्बलता म्हणजेच पाप अशा सहजसोप्या अध्यात्म संकल्पनातून त्याचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले आहे. शिक्षणात साध्य आणि साधन यांचा विचार करताना साध्य इतकेच साधनेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. एकदा ध्येय ठरविले आणि त्याची साधने निश्चित केली म्हणजे ध्येयाचा विचार सोडून दिला तरी हरकत नसल्याचे ते मानत असत.असे डॉ.रोडगे सरांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.