मराठा कुणबी दाखले देण्यासाठी होणारी अडवणूक थांबवणे बाबत सकल मराठा समाज सेलू तर्फे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन.
शिवाजी शिंदे
सेलू : सेलू तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना कुणबी दाखले देण्यासाठी होणारी अडवणूक व त्याच बरोबर नवीन नोंदी सापडण्यास दिरंगाई करणे बाबत संपूर्ण तालुक्यात असंतोष निर्माण झाल्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र शासनाने सूचना दिलेल्या असतांनाही मराठा कुणबी दाखले कोणाची ही अडवणूक न करता तात्काळ देण्यात यावेत. पण सेलू तालुक्यात असे होताना दिसत नाही दाखल्यांसाठी एक महिन्याच्या वर वेळ लागत आहे. अगोदर एवढा वेळ लागत नव्हता तसेच लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक पण होत आहे. दाखले देण्यासाठी टाळाटाळ होत आहे. वेगवेगळी कागदपत्रे व कारणे सांगून मराठा समाजाची आडवणूक होत आहे. आपल्या कार्यालयात मराठा कुणबी दाखल्यासाठी हेलपाटे मारून लोक मेटाकुटीला आले आहेत. तरी तात्काळ मराठा समाजाची आडवणून न करता कोणत्याही दवाबाला बळी न पडता कुणबी मराठा दाखले देण्यात यावे. तसेच सेलू तालुक्यातील काही मोजक्या गावाच्या मराठा कुणबी नोंदी सापडले आहेत. व नवीन नोंदी सापडण्यासाठी आपले प्रशासन उदासीन आहे. त्यामुळे मराठा समाज वंचित राहत आहे. तरी नवीन नोंदी सापडण्या साठी प्रयत्न करावेत. नसता आपल्या कार्यालयात मराठा समाजातर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घ्यावी. असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जयसिंग शेळके, अशोक ताठे, पांडुरंग कदम, महादेव खरात, रमेश शेळके, बाबासाहेब कदम, ज्ञानेश्वर फाटे, शरद मोगल,सखाराम डासाळकर, निशिकांत रोडगे, निळकंठ पवार, माणिक हावळे, अशोक गोरे, बापुराव डख, सुधाकर साखरे, गोविंद ताठे, मोहन ताठे, देविदास ताठे, प्रल्हाद थोंबाळ, कल्याण ताठे, शाम ताठे, मोहन ताठे, नारायण ताठे, वैभव सोळंके,सेलू तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या