निपाणी टाकळी व करडगाव येथे मराठा आरक्षण विजयी मिरवणूक.
शिवाजी शिंदे
सेलू : सेलू तालुकायातील निपाणी टाकळी व करडगाव येथे मराठा आरक्षण विजयी मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. मराठा आरक्षण यौद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून शासनाने सर्व मागण्या मान्य करीत आरक्षणा बाबत दि.27 जानेवारी रोजी आध्यादेश काढला आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.यामुळे संपूर्ण राज्यात जल्लोष आणि विजयोत्सव साजरा करण्यात आला आहे. याचं अनुसंगाने सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी सह करडगाव, गोगलगाव, आंबेगाव, ढे.पिंपळगाव आदिसह या निर्णयाचे स्वागत करुन जल्लोष साजरा करण्यात आला असून जे समाज बांधव मुबंई येथे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गेले होते त्यात प्रामुख्याने निपानी टाकळी येथील समाज बांधवांनी हिरहिरीने सहभाग नोंदविला होता त्यात किरण शिंदे,विष्णू ढगे,
बाळू भाऊ शिंदे,
संजू भाऊ शिंदे,मंगेश ठाकरे, दत्ता शिंदे, अमोल हतडकर, श्रीकिशन अजबे, श्रीकिशन तायनात,
भागोजी शिंदे,भास्कर मगर,रामदास साबळे,
भगवान मगर,बळीराम मगर, प्रदीप मगर,
भगवान झोल, आबासाहेब सावंत,
उद्धव कवडे आदी सह 500 जणांचा समावेश होता.आरक्षणाचा अध्यादेश प्राप्त होताच मुंबईहून काल रात्री निपाणी टाकळी येथे पोहचताच क्षणी समस्त गावातील समाज बांधवांनी त्यांचे पुष्पहार व गुलाल उधळून स्वागत केले.सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून विजयी मिरवणुक काढण्यात आली.ढोल ताशाच्या गजरात सर्व समाज बांधवांनी जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव उपस्थित होते.
टिप्पण्या