मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या शिल्लक रक्कमेतून रुग्णवाहीका खरेदी.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलूतील  मराठा बांधवांचा स्तुत्य उपक्रम; अंतरवालीत जरांगे पाटलांच्या हस्ते लोकार्पण.
 
सेलू : सेलू येथील मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी जमा केलेल्या लोक वर्गणीतून जमा झालेल्या रक्कमेतून त्यातील खर्च होवून जे पैसे उरले त्या पैशातून एक रुग्णवाहिका सर्व समाजातील गोर गरिंबासाठी खरेदी करण्यात आली. अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण आज करण्यात आले. दि. 22 डिसेंबरला सेलूच्या नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर मनोज जरांगे यांची सभा लाखो लोंकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या सभेसाठी संपूर्ण तालुक्यातील खेड्या पाड्यातील  सकल मराठा समाजातील लोंकानी जमेल तशी लोकवर्गणी जमा करून हातभार लावला होता.लोकसभेसाठी स्टेज,लाऊड स्पिकर,विद्धुत रोषणाई, बारीकेटिंग,प्रचार रथ आदी बाबी वर खर्च झाला होता.परंतु समाजातील लोंकानी सढळ हाताने मदत केल्यामुळे खर्च वजा जाता काही रक्कम शिल्लक राहिली होती. त्या रक्कमेचे काय करायचे? याचे नियोजन करण्यासाठी सकल समजाच्या वतिने एक बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांसाठी उपयोगी ठरेल अशी एक वस्तू खरेदी करण्याचे ठरवले आणि त्यानुसार रुग्णवाहीका घेण्याचे निश्चित करण्यात आले.त्यानंतर पुणे येथे आठ लाखाची रुग्णवाहीका खरेदी करण्यात आली. सोमवारी अंतरवाली सराटी येथे  मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान ना नफा ना तोटा या तत्वावर गरजूवंत रुग्णांना वेळेवर सेवा देण्यासाठी रुग्णवाहीका उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे  उपलब्ध असल्याचे सकल मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले.    नववर्षाच्या निमित्ताने घेण्यात रुग्णवाहिकेची कल्पना सुचली याबद्दल मनोज पाटलांनी देखील या कल्पनेबाबत भरभरून कौतुक केले. या नव्या संकल्पनेबद्दल सेलूकरांचे नाव आणखी मोठे होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.