गायीच्या वासरास विहिरीतून बाहेर काढण्यात आले यश.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनीधी परभणी.
 

सेलू : सेलू येथील सप्तपदी मंगल कार्यालय, पारिजात कॉलनी, येथे ३०-३५ फुट खोल विहीरीत एका गाईचे दोन दिवसाचे वासरु पडल्याची घटना  गल्लीतील नागरिकांना समजताच त्यांनी जयसिंग शेळके यांना फोन वरून सांगितले,त्याच बरोबर नगर परिषद सेलू चे कर्मचारी दिलीप दौड यांना माहिती देऊन  नगर परिषद सेलू चे कर्मचारी विठ्ठल काळे, दिपक काळे घटनास्थळी आले.गल्लीतील नागरिकांच्या मदतीने एका लोखंडी बाजेला दोर बांधून एकजण विहीरीत उतरविला व वासराला उचलून घेतले व पुन्हा बाज लोकांच्या मदतीने विहीरीतून वर ओढण्यात आली. वासराचे प्राण वाचवले. यावेळी  जयसिंग शेळके, रवि आडे, माणिक शेळके, शिंदे काका, नायबळ व इतर नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.