हुपरीत दोन गटांमध्ये जागेच्या वादातून हाणामारी.
हुपरी प्रतिनिधी - सागर पाटील शहरांमध्ये जागेच्या वादातून हाणामारी झाली याची फिर्याद मालन रावसाहेब घाटे वय-57रा.महावीर नगर हुपरी यांनी पोलीस ठाणे हुपरी ठिकाणी नोंद दिली आहे.
पोलीसातुन मिळालेली माहिती अशी-मालन रावसाहेब घाडी ह्या अनेक वर्षे झाले महावीर नगर हुपरी या ठिकाणी आपल्या जागेवरती वास्तव्यास आहेत यांच्यासमोर काही कोरवी समाजाचे कुटुंब राहतात ही जागा कोरवी समाजाची आहे या कारणावरून आरोपी संपत कोरवी, लखन कोरवी, तुळशीदास कोरवी, भूषण कोरवी, यांनी फिर्यादीच्या विरुद्ध शिवीगाळ करून त्यांना फावड्याच्या साह्याने मारहाण केलेली असून त्यामध्ये फिर्यादी सह त्यांचा मुलगा लखन व मुलगी मंदाकिनी हे जखमी झालेले असून काल ते हुपरी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यासाठी आले असता लखन व त्यांची मुलगी यांना त्रास होत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले व आज त्यांनी वरील सर्व आरोपी विरोध 323, 324, 504, 506, 34, प्रमाणेगुन्हा नोंद केलेला असून
सदर पुष्पा सचिन माने रा महावीर नगर 323,324,504,506,34 प्रमाणे दाखल केले असून यांनी आरोपीविरोधी फिर्याद देत मालन घाटे,नदां हेगडे,रेणुका घाटे,लखन घाटे,रा महावीर नगर
याच्या विरोधात शिवीगाळ व मारहाणची तक्रार दिली यावेळी काही समाजातील लोकांनी यावर तात्काळ कारवाई करावी व लखन कोरवी (गजरे) यांच्या कुटूंबाला अटक करावी, व मालन घाटे यांच्या कुटुंबीयांना तात्काळ उपचारार्थ दाखल करून रोजगार भत्ता द्यावा व लखन कोरवी यांचे बेकायदेशीर पत्र्याचे शेड काढण्यात यावे व हा विषय न्याय प्रविष्ट असून ही जागा बेकायदेशीररित्या काही अधिकारी यांना हाताशी धरून स्वताच्या नावे करण्यास लखन कोरवी कुटुंब कार्यरत आहे असे निवेदन दिले असून यात लखन कोरवी (गजरे) सपंत कोरवी (गजरे),तुळशीदास कोरवी (गजरे),भुषण कोरवी,पुष्पा माने,बल्लु गजरे,बाळु गजरे,हरी गजरे,भुषण गजरे,चंदु गजरे याच्या विरोधी निवेदन दिले व
अधिक तपास पो स ई सावरतकर व पोसई तिवडे करित आहेत.
टिप्पण्या