विकास कामाला फक्त दोन वर्षाचा कालावधी मिळाला :खा. धैर्यशील माने
आपल्या खासदारकीच्या कालावधीत पाच वर्षांपैकी केवळ दोन वर्ष विकास कामासाठी मिळाले असली तरी मतदारसंघातील कोणतेही गाव निधीपासून वंचित राहिले नसल्याचे मत खासदार धैर्यशील माने यांनी केले. अनेक टाकळी येथील वीस लाख निधीतून जन सुविधा व दलित वस्ती सुधारणा कामाचे उद्घाटन झाले. ते म्हणाले पहिले दोन वर्ष कोरोना काळात निधी घोटवला होता. तर विरोधी पक्षात असल्याने विकास निधीसाठी मर्यादा येत होत्या. सध्या सुमारे 82 कोटी पेक्षा जास्त प्रमाणात निधी उपलब्ध करून मतदार संघातील प्रत्येक गावासाठी विनियोग केला आहे. याचबरोबर मतदार संघातील तीन राष्ट्रीय मार्गासाठी मोठ्या प्रमाणात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून कामास प्रारंभ झाला आहे. तसेच दूध उत्पादकांना शासनाच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम केले आहे. भविष्यात देखील विकास कामासाठी प्रयत्नशील राहणार आहे. यावेळी उपसरपंच श्रीधर भोसले यांच्या हस्ते खासदार माने यांचा सत्कार झाला यावेळी जिल्हा नियोजन कमिटीचे सदस्य चंद्रकांत मोरे. शिवसेना तालुका उपप्रमुख संभाजी गोते. माझी उपसरपंच संतोष गायकवाड. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राकेश खोंद्रे. हरिचंद्र पाटील.. शंकर पाटील .अविनाश मगदूम .अजित वाणी .उमेश पाटील. अनिल पाटील. प्रभाकर पाटील .पोपट पाटील. यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या