ज्ञानज्योती विद्यार्थी बचत बँकेचे उद्घाटन.
मानवत : पीएम.श्री. जि. प. के. प्रा. शा. मानवत येथे आज दिनांक 12/01/2024 रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने स्टेट बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर मा.अतुल चव्हाण साहेब आणि मा. संदिप चव्हाण साहेब यांच्या हस्ते ज्ञानज्योती विद्यार्थी बचत बँकेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी अतुल चव्हाण साहेबांनी विद्यार्थ्यांना बचत ही काळाची गरज आहे. ती बचत करण्याची सवय तुम्हाला आतापासून लागावी म्हणून सरांनी केलेले हे प्रयत्न अभिनंदनास पात्र आहेत. पैसे कसे भरावे, कसे काढावे याचे ज्ञान तुम्हाला येथेच दिले जात आहे. ही आनंदाची बाब आहे. असे सांगितले. तसेच संदिप शिंदे सरांनी विद्यार्थ्यांना तुमची शाळा म्हणजे शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञान देणारी शाळा आहे असे सांगितले. यावेळी शाळेत चाललेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. प्रत्येक वर्गात जाऊन वर्गाची रंगरंगोटी पाहून शाळाच बोलकी झाल्याचे समाधान व्यक्त केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचलन नामदेव खिळदकर व आभार रामराव सोळंके यांनी केले.
टिप्पण्या