संस्थेच्या माजी विद्यार्थिनी यांनी प्रशालेस स्नेहभेट.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

सेलू : नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल नूतन कन्या उच्च माध्यमिक विभाग सेलू येथील (1992 - 1993) बॅचमधील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थिनी सौ.आदिती कोठेकर(दाशरथे),सौ.कल्याणी देशमुख (अंबडकर),सौ.कल्याणी सुभेदार(कुलकर्णी) सौ.अनुराधा सोनेकर (देशपांडे ), सौ.मधुराआनंदगावकर ( अष्टुरकर ), सौ.सुप्रिया भरदम ( अवसरमोल ), सौ.सुषमा शिकारे ( बरकुले ),सौ.कावेरी हुंबे (येवले) सौ.वैशाली परभणीकर (लिंगायत), सौ.मनीषा जोशी (मैराळ), सौ.दिपाली जोशी ( आठवले ),
सौ.अंजली देशपांडे (भोसीकर),सौ.वंदना तिळकरी (महाजन) आदी माजी विध्यार्थिनींनी प्रशालेस भेट दिली.यावेळी
संस्थेच्या वतीने डॉ. एस.एम.लोया यांनी माजी विद्यार्थिनी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच नूतन कन्या प्रशालेच्या वतीने माजी विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्वागताला उत्तर देतांना प्रशालेचे विस्तारीत व परिपूर्ण झालेले बांधकाम,प्रशालेतील सुसज्ज ग्रंथालय,सर्व सोयी युक्त क्रीडा भवन आदी पाहून सर्व   माजी विद्यार्थिनी यांनी समाधान व्यक्त केले. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या बंदिस्त प्रेक्षागृह क्रीडा हॉलला भेट दिली या वेळेस आनंद व समाधान व्यक्त केले. त्यांनी संस्थेच्या व प्रशालेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळेस संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम लोया सर, नूतन कन्या प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका सौ.एस.एम.चाटे मॅडम, सौ.एस.पी.रामदासी मॅडम, सेवानिवृत्त कला शिक्षक एस.डी.
बारस्कर सर, के.पी.राठोड सर, प्रभारी मुख्याध्यापक आर.एस.मोगल सर, एस.व्ही.पाटील सर, उपमुख्याध्यापक डी.बी.घोगरे सर, पर्यवेक्षक डी.डी. सोन्नेकर सर, सहशिक्षक अशोक लिंबेकर सर,फुलसिंग गावित सर, शिक्षिका सौ.कीर्ती राऊत मॅडम, बालाजी देऊळगावकर, आकाश चव्हाण सर, सेविका श्रीमती बेबी हेलसकर यांची उपस्थित  होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.