दिव्यांग वृद्ध माता पिता यांना फटाके आणि मिठाई वाटप करत केली आपली दीपावली साजरी - समाजसेविका अनंतलक्ष्मी कैलासन
कोंढवे धावडे - श्रावस्ती फाउंडेशन दिव्यांग मुलामुलींची शाळा,श्री स्वामी अंगण वृध्दाश्रम व विसावा सोशल फाउंडेशन येथे एन्जॉय ग्रूप पुणे यांच्या वतीने दिवाळी साठी फटाके व मिठाई वाटप करत थोर समाजसेविका सौ. अनंतलक्ष्मी कैलासन यांच्या शुभहस्ते देत आपली दिवाळी एका अनोख्या उपक्रमाने साजरी करत जिथं गरज तिथेच मदत अनोखा संदेश देत दिवाळी साजरी न करता मदतीची दिवाळी साजरी केली... या वेळी जवळ पास शंभर मिठाईचे बॉक्स व दीव्यांग मुलांना दोन पोती फटाक्याची मदत करणारा पाहिलाच एन्जॉय ग्रूप पाहिला निस्वार्थ मदत करणारी पहिलीच समाजसेविका ही सौ.अनंतलक्ष्मी कैलासन यांच्या रूपात दिसली तसेच सामाजिक बांधिलकीची दिवाळी साजरी होणे गरजेचे आहे, आपणं दीपावली साजरी करत असताना आपल्या मुळे वृद्ध माता पित्यांची, दिव्यांगांची, गरीब जनतेची दिवाळी कशी साजरी होईल याकडे लक्ष देणं गरजेचं वाटतं आहे, आपणं देणं लागतो या समाजाच्या बांधिलकीच पुण्य कसेही मिळू शकते पण कर्मृरूपी आशिर्वाद आपणास फक्त आपण करत असलेल्या प्रामाणिक कार्यामुळेच प्राप्त होते त्यासाठी जाणीव असणे फार गरजेचे असते ही जाणीव समाजातील प्रत्य...