फ्रेंड्स फॉरेवर ग्रुप हे महिलांचे हक्काचे व्यासपीठ
प्रतिनिधी:रियाज जैनापुरे फ्रेंड्स फॉरेवर हा ग्रुप महिलांसाठी एक हक्काचे व्यासपीठ आहे ह्या ग्रुपची स्थापना मागील 7 वर्षांपूर्वी करण्यात आली ज्यावेळी हा ग्रुप स्थापन करण्यात आला त्यावेळेस यामध्ये 30 महिला सहभागी होऊन हा ग्रुप स्थापन करण्यात आला आज या ग्रुप मध्ये 160 महिला आहेत या ग्रुप तर्फे गोरगरिबांना मदत करणे कोरोना काळात अन्नधान्य वाटप करणे रुग्णांना फळ वाटप करणे तसेच जेवण आणि औषध पाणी देणे असे अनेक उपक्रम राबवले जातात प्रत्येक वर्षी ह्या ग्रुप कडून सहलीचे नियोजन केले जाते उपक्रम राबवल्यानंतर एक मनोरंजन म्हणून या ग्रुप कडून सहलीचे नियोजन केले जाते सहलीमध्ये देखील हा ग्रुप उपक्रम राबवत असतो आज महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी हा ग्रुप महत्त्वाची भूमिका बजावत आहे या उपक्रमाचे व सहलीचे नियोजन शितल चौगले,उमा पाटील, सरिता घाटगे,भारती सावंत आणि अर्पणा कोळी या महिला नेहमी परिश्रम घेतात.