यड्राव येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा .
यड्राव (प्रतिनिधी ) येथे विविध ठिकाणी 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . * कुमार व कन्या विद्या मंदिर -- येथे ध्वजाचे पुजन ग्रा . प . सद्स्य रंगराव कांबळे व सारंग काकडे यांनी केले . तर ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ . चिमाताई आदमाने व उपाध्यक्षा सौ . सुप्रिया मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी पत्रकार संतोष साने , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चवगोंडा पाटील , अध्यक्षा रिया? प्रभाळकर , अभिजीत उपाध्ये , मुख्याध्यापक डी . के . पाटील , मुख्याध्यापक आंबी सर , सर्व शिक्षक स्टाफ , ग्रामस्थ व विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित होते . * ग्रामपंचायत कार्यालय -- येथे ध्वज पुजन माजी सरपंच सरदार सुतार व माजी उपसरपंच शिवाजी दळवी यांच्या हस्ते करण्यात आले . ध्वजारोहण पार्वती इंड . ईस्टेट चे संचालक महावीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी सरपंच कुणालसिंह नाईक - निंबाळकर , उपसरपंच सौ . वैशाली साळोखे , चंदू पडियार , राजकुमार जांभळे , परशराम कत्ती , सर्व ग्रा . प . सद्स्य , ग्रामविकास अधिकारी उमेश रेळेकर , ग्रा . प . कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते . * शरद विकास सेवा सोसायटी -- येथे ध्वजारोहण मारुती क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी व्हा . चेअरमन महावीर पाटील , जिवंधर मुरचिट्टे , बबर कांबळे , विकास दानोळे , शिवाजी पाटील (बापू ) , संजय धूपदाळे , आप्पासो लवाटे , सचिव भरत इंगळे , सर्व संचालक , सभासद व कर्मचारी उपस्थित होते . *सदाबहार ग्रामीण नागरी पत संस्था -- येथे ध्वजारोहण कैय्युम मोमीण यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी संस्थेचे चेअरमन प्रा . अशोक रेंदाळे , व्हा . चेअरमन आप्पासाहेब पाटील , भुपाल दावाडे , कल्लू चव्हाण , शालिनिदेवी इंगवले , सुधीर तुपारे , शरद चाफेकर , सचिव विष्णू काकडे , सर्व संचालक , सभासद व सेवक वर्ग उपस्थित होते . *तलाठी कार्यालय -- याठिकाणी तलाठी गणेश आवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी पोलीस पाटील जगदिश सपकाळ , सुरगोंडा पाटील , अजित पाटील , उत्तम कांबळे , सतीश माने , विजय कोळी , रवि भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते . *शामराव पाटील यड्रावकर हायस्कूल -- येथे उद्योगपती संजय चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी प्रा . आण्णासाहेब क्वाणे सर , माजी विद्यार्थी अनिल भंडारी , मुख्याध्यापिका मणिषा पाटील , सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते . *पार्वती विद्या मंदिर आर. के . नगर -- येथे ग्रा . प . सद्स्या सौ . प्राची हिंगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी ग्रा . प . सद्स्य बाबासाहेब राजमाने , प्रदिप हिंगे , प्रविण देवकाते , रत्नाकर पडियार , सचिन गोसावी , सुनिल गोसावी , संपदा सावंत , मुख्याध्यापिका सुषमा लोखंडे , प्रतिक्षा कुंभोजे , अक्षदा कुंभोजे , सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित होते . * नाईक - निंबाळकर विकास सेवा सोसायटी -- येथे व्हा . चेअरमन रमेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी चेअरमन विलास माने , माजी जि . प . सद्स्य राजवर्धन नाईक - निंबाळकर , चवगोंडा पाटील , केशव धूमाळे , पांडूरंग निर्मळ , बाळासाहेब घाटगे , वैभव कोळी , राजाराम काळगे , सर्व संचालक , सभासद व कर्मचारी उपस्थित होते .
टिप्पण्या