46 कोटी पाणी योजनेचे काम तात्काळ सुरू करा अन्यथा मूख्याधिकारी दालनात आंदोलन करण्याचा नागरिक हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य समिती शहर प्रमुख अभिनव गोंधळी यांचा इशारा

हुपरी प्रतिनिधी -  हुपरी शहरासाठी नगरोत्थान महाभियानातर्गत नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. त्या योजनेची वर्क ऑर्डर देऊन पाच महिने झाली तरी अद्याप कामाला सुरुवात झाली नाही सुरुवातीपासूनच ही योजना फिक्सिंग टेंडर प्रक्रिये मधुन पार पाडली आहे.जास्तीत जास्त मलिदा कसा मिळवता येईल याचेच नियोजन करून या योजनेचे एकूण कामकाज आतापर्यंत झाले आहे. जाचक जिओ टॅगची अट घालून आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला टेंडर मिळावे यासाठीच तीन ठेकेदारांन जिओ टेक प्रमाणपत्र देण्यात आले होते. सर्व टेंडर हे अभाव रक्कमेने म्हणजेच टेंडर रक्कमे पेक्षा जास्त रक्कमेने भरण्यास सांगितले होते जेणेकरून टेंडर हे मूळ किमतीलाच मिळावे यासाठी हे सर्व फिक्सिंग मॅनेज टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली होती यामध्ये या सर्व घडामोडी करण्यासाठी प्रशासन व ठेकेदार आघाडीवर होते. ही योजना आता मॅनेज टेंडर प्रक्रियेतून झाली असल्याचे आता जनतेसमोर येत आहे. यामुळे या योजनेची चौकशी होऊन प्रशासनातील अधिकारी यांची चौकशी करून रिटेंडर करण्याची गरज होती. तरीही असे न करता दाबून रेटून वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. वर्क ऑर्डर देऊनही आता पाच महिने झाली आहेत.तरीही जागेवरती काम चालू नाही प्रशासन व ठेकेदार कागदपत्रांचा खेळ करण्यातच धन्यता मानत आहे.सदर योजनेची मुदत १८ महिने असताना त्यातील पाच महिने ही कागदपत्रे खेळ करण्यातच प्रशासनाने व  ठेकेदारांने घालल्यामुळे सदर योजनेला मुदतवाढ द्यावी लागणार आहे तसेच योजनेच्या एकूण खर्चा मध्ये लाखो रुपयाची वाढ होण्याची शक्यताही आहे. याचा अतिरिक्त भार शासनावर न होता तो हुपरी नगरपालिकेवर होणार आहे म्हणजेच हुपरीतील नागरिकांच्या खिशातूनच हा वाढीव निधी गोळा करावा लागणार आहे. यामुळे ही योजना वेळेत चालू होऊन पूर्ण होणे गरजेचे आहे. सदर योजनेचे काम तात्काळ चालू करा अन्यथा ३ फेब्रुवारी रोजी ठीक ११ वाजता नगरपरिषद कार्यालय मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा समितीचे शहर प्रमुख अभिनव गोंधळी यांनी दिला आहे यावेळी समितीचे उपशहर प्रमुख सुहास माने, समितीचे सचिव सूर्यकांत रावण,समिती सदस्य राजेंद्र उगळे, संदीप भंडारे, दादासाहेब कामते, सुनील सांगवडे, बबलू मुधाळे, बाळासाहेब शेटके, उमेश लोंढे , राजेंद्र परीट ,दत्तात्रय महाजन, संतोष परीट, सुदर्शन पोतदार ,संजय पाटील आदी समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.