बांधकाम कामगारांची वेबसाईट व पोर्टल पूर्ववत सुरू करा. संयुक्त बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निवेदन.

इचलकरंजी - बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज  बाबतची ऑनलाईन वेबसाईट व पोर्टल कामगारांना व्यक्तिगत अर्ज दाखल करण्यासाठी बंद ठेवला आहे. तो तो सुरु करा जाहीर केलेला बोनस ( सानुग्रह अनुदान) द्या या मागणीसाठी संयुक्त बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीने आज प्रांत अधिकारी कार्यालयातील शीलेस्तेदार मा.  संजय  काटकर साहेब  व सहाय्यक कामगार आयुक्त मा जानकी भोईटे यांना निवेदन देण्यात आले 
.     केवळ तालुकास्तरावर सुरू केलेल्या ठेकेदाराच्या सुविधा केंद्रावरूनच बांधकाम कामगारांचे सर्व प्रकारचे अर्ज सादर करण्याची अट आहे. येथे रोज  पन्नास कामगारांची अर्ज दाखल करण्याची  अट घालण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांना दिवसभर ताटकळत थांबावे लागते यामुळे हजारो कामगारांची कामे अडकून पडलेली आहेत.  कामगारांच्या विविध योजना पेक्षा ठेकेदारावर हजारो कोटी खर्च केले आहेत. हे केवळ मंडळाच्या  पैशाची उधळपट्टी सुरु आहे. ती थांबवावी व पुर्वीप्रमाणे ऑनलाईन पोर्टल व वेबसाईट सुरू करावी जाहीर केलेला दिवाळी बोनस ( सानुग्रह अनुदान) कामगारांच्या खात्यावर सोडावे आदी मागण्यांचे निवेदन ही यावेळी देणेत आले. सदर मागणीचा विचार न केल्यास 20 जानेवारी पासून प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 
.       सदर निवेदन वरीष्ट पातळीवर पाठवून सकारात्मक विचार करणेचा प्रयत्न करु असे अश्वासन  शिष्टमंडळा शीलेस्तेदार मा संजय काटकर साहेब व सहाय्यक कामगार आयुक्त मा. जानकी भोईटे यांनी दिले .
 .       यावेळी कामगार नेते कॉ. आनंदा गुरव, रणजीत माने,  गणेश तडाखे, संजय खानविलकर, अशोक सुतार, जयप्रकाश कांबळे, अजय देडे , आकाश बनसोडे, अभिजीत आवळे, कीरण माने, दिपक रेपाळ, सचिन भोरे, राहुल दवडते, अनिल जाधव, पवन आवळे, राहुल शिंदे,  सचिन खाडे, भीमराव जामकर, महेश डांगरे , विकी माने, भैय्यासाहेब धनवडे, गणेश वायदंडे, सुनील खोत, विकी माने, परसराम कत्ती, महेश लोहार आदी कामगार संघटनेचे पदाधिकारी शीष्टमंडळात  उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.