मकर संक्रांति निमित्त बोरगाव येथे विद्यासागर शिक्षण संस्थेत विविध कार्यक्रमाचे आयोजन. 14 जानेवारी रोजी नागरिक संघटनेच्या वतीने एक लाखाच्या विराट शर्यती.

बोरगाव/प्रतिनिधी .
बोरगाव येथील जिनवाणी अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे विद्यासागर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात मकर संक्रांतीनिमित्त विविध स्पर्धा महोत्सव व तिळगुळ वाटप समारंभ व तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे 
सदर कार्यक्रम रविवार दिनांक 12 जानेवारी पासून 14 जानेवारी अखेर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे . रविवारी 12 जानेवारी 2025 रोजी दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या  कार्यक्रमत खास महिलांच्या साठी स्मार्ट सौभाग्यवती या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे, विजेत्या प्रथम क्रमांक च्या संघास 21 हजार रुपये ची पैठणी, जिनवाणी अर्बन क्रॉप क्रेडिट सोसायटी बोरगाव यांच्याकडून देण्यात येणार आहे 
द्वितीय क्रमांक स्मार्ट सौभाग्यवतीला सोन्याची कर्णफुले व तृतीय स्मार्ट सहभागीतेला सोन्याची नथ चतुर्थ क्रमांक स्मार्ट सोबतीला चांदीचा करंडा  अशी  बक्षीस देण्यात येणार आहेत,
  जोडी नंबर वन या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक खास दोन साड्या चंद्ररूप कापड केंद्र यांच्याकडून देण्यात येणार आहे,तर उपविजेत्या  संघास सन्मानपूर्वक भेटवस्तू देण्यात येणार आहे कृती क्रमांक सन्मानपूर्वक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
   सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी दुपारी बारा ते पाच दरम्यान होणाऱ्या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय भाषा हिंदी भाषेला ऊर्जितावस्था देण्यासाठी महिलांच्या साठी खास करून हिंदी अंताक्षरी स्पर्धा व दोरी उडी स्पर्धा संगीत खुर्ची या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ,यावेळी मकर संक्रांतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रम वेळी खाद्यपदार्थ विक्री, ज्वेलरी, विणकाम, भरतकाम इत्यादी स्टॉल साठी सर्वांना संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे 
      बोरगाव येथील नागरिक संघटना च्या वतीने सालाबाद प्रमाणे 14 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता बोरगांव येथे खास करून  परिसरातील शर्यती शौकिनांच्या साठी एक लाखा हुन अधिकच्या जनरल बैलगाडी शर्यती,  जनरल घोडा गाडी शर्यती, एक घोडा एक बैल अशा विविध शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष व माजी जिल्हा पंचायत सदस्य व सिद्धेश्वर को आप क्रेडिट  सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब हावले यांनी दिली आहे.
या कार्यक्रमास विद्यासागर शिक्षण संस्थेचे संचालक अनुज हवले, सिद्धार्थ हवले, विद्याधर अंमंनावर्, रावसाहेब तेरदाले, भाऊसाहेब पाटील, शिवाप्पा माळगे,अनासाब बारवाडे, जनरल मॅनेजर संजय हावले सह जिनवाणी अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव, सिद्धेश्वर क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव, विद्यासागर शिक्षण संस्था बोरगाव चे पदाधिकारी उपस्थित होते.
====================== बोरगांव हुन प्रतिनिधी अजित कांबळे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.