७० व्या कामगार नाट्य महोत्सवात परिवहन सेवेचे बीमोड' मुळासकट ! हे अव्वल नाटक दुसऱ्या क्रमांकावर !
दि०११ डिसेः ले २ जाने. या दरम्यान महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडाळा च्या ७० बा नाट्यमहोत्सव नुकताच पार पडला, आणि परिवहन सेवा या नाट्यमहोत्सवात दरवर्षी भाग घेऊन बक्षीस मिळविण्याचा हिरीरीने प्रयत्न करते आणि या वर्षीच्या २०२४/२५ च्या स्पर्धेत, ठाणे महानगर परिवहन सेवेने मोहन पानसरे लिखित बीमोड" मुळांसकट ! हे वास्तववादी दोन अंकी नाटक घेऊन स्पर्धेमध्ये दूसरा क्रमांक पटकावला, आणि पाच इतर बक्षीस निळवून भरघोस यश आपल्या पदरात पाडून घेतल ! या नाटकाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक विजय पाटील यांनी केले तर यात भाग घेणारे परिवहन सेवेचे गुणवंत कामगार कलाकार श्री. अजून नाईक, भीराम विधाटे, नरेंद्र सावेत, अशोक वाघमारे सौ. प्रतिभा घाडगे, सुहास काकडे, शिवाजी चोरगे , शरयू कांबळे, मंगेश गायकवाड, साईराज लादे, सुजीत भोये, श्रद्धा कदम, स्वप्नील निवाते, सुदर्शन गायकवाड, संजय राठोड, श्री, चंद्रशेखर जगताप, योगेश करंडे, संगीता सात दिवे, ललीता हकारे, अमृत वळवी, राजेश बल्लाळ, विद्या पाटील, मनीषा शेलार, प्रथमेश पाटील, या सर्व कलाकारांनी उत्कृष्ट काम करून आपआपल्या भुमिका साकारल्या,
आणी परिवहन सेवेचे व्यवस्थापक मा. भालचंद्र बेहरे साहेब यांनी या प्रयोगाची निर्मितीची बाजू सांभाळून या स्पर्धेतील नाटकाला बळ दिले...म्हणून परिवहन सेवेच्या नाटकाचे दुसऱ्या क्रमांकाच यश प्राप्त झालं! असं बोललं जात !
खरं तर इतके सारे कलाकार घेऊन, चांगली स्क्रीप्ट निवडून ति गोष्ट जशीच्या तशी परिक्षक / प्रेक्षकांच्या समोर मांडणाऱ्या ह्या नाटय संघाच सर्वत्र कौतुक होत आहे. !
टिप्पण्या