नवीन बदलांचा स्वीकार करीत व आव्हाने पेलत पत्रकारांची वाटचाल प्राध्यापक गोपाळ महामुनी यांचे प्रतिपादन

शमनेवाडी येथे सदलगा विभाग पत्रकार संघाचा पत्रकार दिन साजरा.

प्रतिनिधी - अमर माने
 बेडकिहाळ येथील पत्रकारितेसमोर आव्हाने वाढत आहेत. सीमा भागातील पत्रकारासमोर मोठी आव्हाने असून ज्येष्ठ पत्रकारांच्या आधारावर ही संघटना कार्यरत आहे. 

पत्रकारितेतील नवनव्या बदलांचा स्वीकार करीत, लेखणी सोडून आधुनिक उपकरणांचा वापर करीत, व आव्हाने पेलत निराश न होता समाज व सरकार यांच्यातील दुवा म्हणून पत्रकार कार्यरत आहेत. वृत्तपत्रातून अद्यापही सजग वार्तांकने देऊन आधुनिक युगातही पत्रकारितेचे वैभव टिकून असल्याचे प्रतिपादन बेडकिहाळ येथील प्राध्यापक गोपाळ महामुनी यांनी केले.

सदलगा विभाग पत्रकार संघाच्या वतीने सदलगा शमणेवाडी दरम्यान असलेल्या अमृत गार्डन येथे आयोजित मराठी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

महामुनी पुढे म्हणाले पत्रकारितेत कमी वेळेत अधिक पैसा मिळत नसल्याने नवी पिढी यापासून दूर जात आहे. अनेक आव्हानांचा सामना करीत व विश्वासार्हता जपत या संघटनेच्या पत्रकारांची वाटचाल सुरू आहे. पत्रकारितेमध्ये अनेक बदल झालेत व होतही आहेत. 

पत्रकारांनी लेखणी सोडून स्वतःमध्ये बदल घडवीत मोबाईल सारख्या आधुनिक उपकरणांचा कौशल्याने वापर करीत पत्रकारितेच्या प्रवाहात टिकून राहणे आवश्यक आहे. पत्रकारितेला समाजातून आश्रय मिळणे आवश्यक आहे. अलीकडे ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर येत असल्यामुळे पत्रकारिताच नव्हे तर सर्वच क्षेत्रासमोर याचे आव्हान आहे. पण नव्या बदलांचा स्वीकार करीत आव्हाने पेलत निराश न होता वाटचाल करावी लागेल. फेक न्यूज, पित पत्रकारिता अशी सर्व आव्हाने पेलत आपली प्रतिमा सांभाळत वाटचाल करावी लागणार आहे. 

पत्रकारितेमध्येही राष्ट्रीय पातळीवर विभागणी होत असून प्रसारमाध्यमांनी निधर्मी पारदर्शक व जातपात असे भेदभाव न करता कार्य केल्यास चांगल्या समाजाची निर्मिती होण्यास हातभार लागतो. पत्रकारांनी संघटित होऊन नवीन बदल स्वीकारत समाजासाठी काय चांगले करता येते ते करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले.

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे प्रा. बाळासाहेब शिंदे यांनी ज्या समाजात पत्रकार जागृत असतो तो समाज सुखी समाधानी असतो. त्यामुळे समाजात पत्रकार जागृत राहण्यासाठी समाजांनी त्यांच्या पाठीशी राहणे आवश्यक आहे. पत्रकारांना आवश्यक त्या सुविधा देण्याची गरज आहे. पत्रकार आपले काम प्रामाणिकपणे करीत असून पत्रकार माणुसकी व कर्माने, शब्दाने श्रीमंत असतो. पत्रकारांच्या व्यथा समाजाने समजावून त्या सोडवण्यासाठी पुढे यावे असे सांगितले.
प्रारंभी संघाच्या मावळत्या अध्यक्षा लिना संकपाळ यांच्या हस्ते आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कर्नाटक राज्य कार्यरत (श्रमिक) पत्रकार संघाचे जिल्हा संचालक व चिकोडी तालुका अध्यक्ष राजेंद्र कोळी, ज्येष्ठ पत्रकार सुभाष बदनीकाई, मकरंद द्रविड आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कोल्हापूर जिल्हा वेल्फेअर संघाच्या वतीने पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बोरगाव येथील पत्रकार शिवाजी भोरे तसेच मावळते अध्यक्ष लीना संकपाळ, उपाध्यक्ष तात्यासाहेब कामत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास अजित शिंदे, संजय कुलकर्णी, अरुण संकपाळ, शामलिंग किल्लेदार, संतोषकुमार कामत, अजित सुतार, विष्णु शिंगाडे, राजू कोळी, अजित कांबळे, तानाजी पवार, कुमार संकपाळ, अण्णासाहेब कदम, अनंत दिक्षीत, बाबासाहेब सदलगे, विक्रम शिंगाडे, उदय पांगिरे, अमर माने व पत्रकार उपस्थित होते. पत्रकार संतोषकुमार कामत यांनी स्वागत व प्रास्ताविक तर गजानन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अजित कांबळे यांनी आभार मानले. विशालक्रांती न्यूजसाठी अमर माने बेडकीहाळ.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.