७ फेब्रुवारी रोजी आयटकचा कामगार कार्यालयात घेरावा व ठिय्या आंदोलन - कॉ. आनंदा गुरव
इचलकरंजी
मंडळाची वेबसाईट व पोर्टल केवळ तालुका सुविधा केंद्रावर सुरू ठेवल्यामुळे बांधकाम कामगार नोंदणी, नूतनीकरण व लाभापासून बहुसंख्येने वंचित राहत पहाटे पासुन टाककळत उभा रहावे लागत असल्याने पोर्टल पुर्वी प्रमाणे सुरु करावे व इतर प्रमुख मागण्यांच्यासाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना ( आयटक) वतिने 7 फेब्रुवारी रोजी कामगार कार्यालयाला घेराव व ठीय्या आंदोलन
. केवळ ठेकेदारांना पोसनेसाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसहितेपासून मंडळाचे नोंदणी नूतनीकरण व लाभा संदर्भातील सर्व कामकाज तालुका सुविधा केंद्रावर केंद्रात केल्याने बांधकाम कामगारांची सुविधा होण्याऐवजी प्रचंड गैरसोय व समस्या निर्माण झालेल्या आहेत. हे केवळ कंपन्यांचे भले करण्याचा डाव आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये गेल्या दोन वर्षात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आहे व मंडळाचे हजारो कोटी म्हणजे 75 टक्के पैसे ठेकेदारांवर उधळून संपवलेले आहेत. त्याचे ऑडिट होऊन ताबडतोब चौकशी व्हावी.
. या प्रश्नाच्या सोडोनुकीसाठी साहित्याच्या वतीने २ डीसेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आले यानंतर कामगार मंत्री, सचीव, जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले. परंतु अद्याप कोणती हालचाल नाही.
. या आंदोलनाची दिशा तीव्र करणे करीता 7 फेब्रुवारी 2025 रोजी आयटक संघटनेच्या नेतृत्वात बांधकाम कामगारांचे कामगार कार्यालयाला घेराव आंदोलन करण्यात येत आहे व जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत व कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कामगार ठिय्या मारून कामगार कार्यालयाच्या दारात बसून राहतील याची आपण नोंद घ्यावी असा इशारा कामगार नेते कॉ.आनंदा गुरव यांनी दिला आहे.
टिप्पण्या