जनवाड येथील श्री गणपती मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी धर्मस्थळ कडून एक लाख रुपयाचा धनादेश.

प्रतिनिधी - शितल कुडचे 
जनवाड.ता. चिकोडी येथील श्री आनंदा ज्योतिबा मोकाशी यांनी साडेपाच गुंठे जमीन मंदिरासाठी दान दिलेल्या जागेमध्ये स्वामी विवेकानंद युवा सेवा संघ यांनी 2012 मध्ये स्थापित केलेल्या गणपती मंदिराच्या सर्वांगीण जीर्णोद्धारासाठी धर्मस्थळ ग्रामीण वृद्धी संघ कडून एक लाख रुपयाचा धनादेश विवेकानंद सेवा संघाचे अध्यक्ष माननीय श्री आनंद मोकाशी
 यांच्याकडे श्री विठ्ठल सालीयान(धर्मस्थळ ग्रामांभिवृढी योजना जिल्हा संचालक) यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आला .या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी सर्वप्रथम डॉक्टर रमेश चौगुले यांनी  स्वागत व प्रस्ताविक केले त्यानंतर स्वामी विवेकानंद युवा सेवा संघाकडून श्री विठ्ठल सालियान यांचा सत्कार संघाचे अध्यक्ष श्री आनंद मोकाशी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला तसेच मंजू नायक (धर्मस्थळ ग्रामभिवृद्धी निपाणी योजना अधिकारी) यांचा सत्कार युवा संघाचे सेक्रेटरी संजय रवळू केदारी यांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर सिद्धांना कट्टी कर (बेडकिहाल सर्कल अधिकारी) यांचा सत्कार श्री अनिल मगदूम यांच्या हस्ते तर संजना मोकाशी (अध्यक्ष जनवाड धर्मस्थळ संघ) यांचा सत्कार सौ पुनम मगदूम यांच्या हस्ते करण्यात आला 
      या कार्यक्रमा वेळी विठ्ठल साली यान म्हणाले की सर्वप्रथम आपण प्रत्येक कार्यक्रमा वेळी सर्वप्रथम गणपतीची पूजा करतो की आम्हाला आमच्या कामांमध्ये यश दे तसेच स्वामी विवेकानंद म्हणतात की शंभर मुले नको फक्त दहा मुले माझ्या हातामध्ये द्या जे काय समाजासाठी बदल घडवायला लागतात ते मी घडवेन त्याप्रमाणे या स्वामी विवेकानंद युवा सेवा संघाची दहा मुले एकत्र येऊन येथे गणपती मंदिर बांधून यामध्ये मूर्ती प्रतिष्ठापना करून सर्वांसाठी खुले केले तीच तुमची सगळ्यात मोठी समाजसेवा त्यामुळे मी तुमच्या विवेकानंद सेवा संघाचे सर्वप्रथम अभिनंदन करतो असे ते म्हणाले 
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष आनंदा मोकाशी  . उपाध्यक्ष डॉक्टर रमेश चौगुले. सेक्रेटरी संजय रवलू केदारी. सदस्य अनिल मगदूम. डॉक्टर संदेश रवळू  केदारी.अण्णाप्पा कच्चे. बाळू मगदूम. दीपक रेंदाळे. अरुण झोंड. सुनील मगदूम. आनंदा मगदूम. श्रीधर पाटील. सोहम चौगुले. रोहन रवळु केदारी. दयानंद भोजने. महादेव यादव. महादेव पाटील. कृष्णा घाटगे. सौ पुनम मगदूम. तसेच विवेकानंद सेवा संघाचे सर्व सदस्य नागरिक उपस्थित होते शेवटी संघाचे सेक्रेटरी संजय रवळू केदारी यांनी सर्वांचे आभार मानले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.