नगर सेवक अभय मगदूम यांच्या वाढदिवसा निमित्त बोरगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

बोरगांव /प्रतिनिधी.
बोरगाव येथील विद्यमान नगरसेवक व जय गणेश व गौरी गणेश महिला को- ऑप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अभयकुमार मगदूम यांच्या वाढदिनी मंगळवारी १४ जानेवारी २०२५ रोजी विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती जय गणेश सोसायटीचे उपाध्यक्ष अँड सचिन रोड यांनी दिली.
        बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना सचिन रोड म्हणाले, सामाजिक, क्रीडा शैक्षणिक व सहकार क्षेत्राला - नेहमीच प्राधान्य देत सर्वसामान्य - व गरजवंतांना नेहमीच मदत करणारे आमच्या संस्थेचे अध्यक्ष - अभयकुमार मगदूम यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रमातून साजरा केला जातो. गेल्या ४ वर्षापासून बोरगाव येथे आपण मोफत असे सर्व रोग निदान शिबिरांचे आयोजन करीत असतो यामध्ये अनेक रुग्णांना लाभ मिळालेला आहे. यावर्षी बोरगाव व - परिसरातील रुग्णांना लाभ व्हावा यासाठी जय गणेश व गौरी गणेश महिला को ऑप सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत हृदयरोग, अग्निकर्म, मधुमेह, ईसीजी, बीपी, नेत्ररोग, मोतीबिंदू, नेत्र तपासणी, दंतरोग, तसेच मोफत दारू, सिगरेट व गुटखा व्यसनमुक्तीचे विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच भव्य रक्तदान शिबिराचे ही आयोजन केले आहे.
  या कार्यक्रमास डॉ. माने आयु केअर व हार्ट केअर सेंटर मांजरी येथील डॉ. जे बी माने व डॉक्टर सीमा माने तसेच, डॉ. अमित बसन्नावर व डॉ.असिफ कलावंत, टे. के. आय क्लीनिक सांगली येथील डॉ. रमाकांत टेके व विशाखा टेके, निर्मल व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र मिरज येथील डॉ. चंद्रशेखर हळींगळे, पद्मभूषण वसंतदादा पाटील श्री दंडनाथ क्षेत्र मंडळी संचलित प्रकाश बापू पाटील ब्लड बँक सांगली, व ब्रह्मणाथ मेडिकल डिस्ट्रीब्यूटर शिरदवाड व जय गणेश मेडिकल यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. तसेच तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना मोफत औषधांचेही वितरण करण्यात येणार असून सर्वांनी या शिबिराचे लाभ घ्यावे असे आवाहन शेवटी सचिन रोड यांनी केले.

पत्रकार बैठकीस डॉ राजगौडा पाटील, अरुण बोने, रावसाहेब सवाडे , राजेंद्र फिरगन्नावर, कुणाल वठारे , मौला मुजावर, संजय ऐदमाळे , बाळासाहेब फिरगन्नावर, तुळशीदास वसवाडे, राजू बल्लोळे, बाहुबली फिरगन्नावर, बाबासाहेब मगदूम, सुरेश गोसावी राजू शिंगे, सीईओ संतोष हंचनाळे सह कर्मचारी  उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.