सदलगा विभाग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मकरंद द्रविड, उपाध्यक्ष पदी वैभव खोत तर सचिवपदी अजित सुतार यांची सर्वानुमते निवड.
बेडकिहाळ - सदलगा विभाग पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी (ता.06) रोजी शमनेवाडी येथील नुकत्याच झालेल्या अमृत गार्डन, येथे पत्रकार दीन कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी मावळते अध्यक्षा लीना संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ठ पत्रकार मार्गदर्शक सुभाष बदनिकायी,शमलिंग किल्लेदार, संतोष कामात, राजेंद्र कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत 2025 / 26 या वर्षासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव पदाची निवडीची चर्चा झाली. यावेळी संघाच्या अध्यक्षपदी मकरंद द्रविड, (सदलगा) यांची उपाध्यक्ष पदासाठी वैभव खोत, (गळतगा ) यांची तसेच सचिवपदी म्हणून अजित सुतार, (मलिकवाड) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
याप्रसंगी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव यांचा सत्कार प्रमुख पाहुणे डॉ. गोपाळ महामुनी, बाळासाहेब शिंदे, उदय पांगिरे, व विक्रम शिंगाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. यावेळी नूतन अध्यक्ष मकरंद द्रविड म्हणाले की, सदलगा विभाग पत्रकार संघाच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबून संघाच्या आभिरूद्धी साठी सतत प्रयत्नशील राहीन, त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार नेहमी पाठीशी राहो असे ते म्हणाले.
यावेळी शामलिंग किल्लेदार, गजानन पाटील, विष्णू शिंगाडे, कुमार संकपाळ, तानाजी पवार, शिवाजी भोरे, अजित शिंदे, संजय कुलकर्णी, आण्णासाहेब कदम, अमर माने, तात्यासाहेब कामत, अनंत दीक्षित, अजित कांबळे, राजू संकपाळ, बाबासाहेब सदलगे, आदी उपस्थित होते. शेवटी अजित कांबळे यांनी आभार मानले. विशालक्रांती न्यूजसाठी अमर माने मलिकवाड.
टिप्पण्या